DailyNews24Tas

Latest Online Breaking News

35 वर्षीय महिलेचा शेतात मृतदेह सापडला, डोक्यात दगड घालून हत्येचा संशय

35 वर्षीय महिलेचा शेतात मृतदेह सापडला, डोक्यात दगड घालून हत्येचा संशय

😊 Please Share This News 😊

अमरावती : शेतात 35 वर्षीय महिलेचा मृतदेह (Dead Body) आढळल्याने परिसरात एकच खळबळ उडाली आहे. अमरावती (Amravati) जिल्ह्यातील धारणी पासून 20 किमी अंतरावर असलेल्या बिजुधावडी ते हातिदा गावादरम्यानच्या शेतात हा प्रकार घडला. धारणी पोलिसांना माहिती मिळताच पोलिसांचे पथक घटनास्थळी पोहोचले. मृतदेह पाहून अज्ञात व्यक्तीने डोक्यात दगड ठेचून या महिलेची हत्या केल्याचा आरोप होत आहे. महिलेची अद्याप ओळख पटलेली नाही. महिलेची हत्या कोणी केली, हे अजून समजलेलं नाही. हत्येचं कारणही अस्पष्ट आहे.

काय आहे प्रकरण?

35 वर्षीय महिलेचा मृतदेह अमरावती जिल्ह्यातील धारणी पासून 20 किमी अंतरावर असलेल्या बिजुधावडी ते हातिदा गावादरम्यानच्या शेतात सापडला. धारणी पोलिसांना घटनास्थळी धाव घेत पंचनामा केला. महिलेची अद्याप ओळख पटलेली नाही.

डोक्यात दगड घालून हत्येचा संशय

महिलेच्या मृतदेहाची अवस्था पाहता डोक्यात दगड घालून तिची हत्या झाल्याचा प्राथमिक अंदाज आहे. पोलीस उपविभागीय अधिकारी गोहर हसन यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक सुरेंद्र बेलखेडे व पोलीसाचे पथक या प्रकरणाचा तपास करत आहेत.

महिलेची ओळख पटवण्यासाठी आजूबाजूच्या गावकऱ्यांच्या पोलीस पाटलांना घटनास्थळी बोलवण्यात आले आहे, तसेच डॉग स्क्वॉड आणि फॉरेन्सिक लॅबच्या टीमलाही घटनास्थळी पाचारण करण्यात आले आहे. धारणी पोलीस या प्रकरणाचा पुढील तपास करत आहेत.

व्हाट्सप्प आइकान को दबा कर इस खबर को शेयर जरूर करें 

स्वतंत्र और सच्ची पत्रकारिता के लिए ज़रूरी है कि वो कॉरपोरेट और राजनैतिक नियंत्रण से मुक्त हो। ऐसा तभी संभव है जब जनता आगे आए और सहयोग करे

Donate Now

[responsive-slider id=1466]