DailyNews24Tas

Latest Online Breaking News

Mumbai Corona Update : मुंबईत शनिवारी 130 कोरोना रुग्णांची नोंद, एका बाधिताचा मृत्यू

😊 Please Share This News 😊

Mumbai Corona Update : मुंबईतील कोरोना रूग्णांच्या संख्येत चढ-उतार होत आहे. महापालिकेच्या आरोग्य विभागाने दिलेल्या माहितीनुसार आज मुंबईत 130 नव्या कोरोना रूग्णांची नोंद झालीय. तर एका कोरोना बाधिताचा मृ्त्यू झालाय. तर आज 121 रूग्ण कोरोनावर मात करून घरी परतले आहेत. मुंबईतील कोरोनामुक्तीचा दर 98. 2 टक्के एवढा आहे.  आज 14 रूग्णांना उपचारासाठी रूग्णालयात दाखल करण्यात आले आहे. उर्वरित रूग्णांमध्ये गंभीर लक्षणे नसल्याने या रूग्णांवर घरीच उपचार सुरू आहेत. 

सक्रिय रूग्ण 
राज्यातील सर्वात जास्त सक्रिय रूग्ण हे मुंबईत होते. परंतु, गेल्या काही दिवसांमध्ये यात घट होऊन मुंबई आता राज्यात सक्रिय रूग्णांसाठी दोन नंबरला आहे. सध्या मुंबईत 697 सक्रिय रूग्ण आहेत. राज्यात सध्या सर्वाधित सक्रिय रूग्ण हे पुण्यात आहेत. दिलादायक बाब म्हणजे गेल्या महिन्याभरापासून मुंबईतील नव्या रूग्णांसह सक्रिय रूग्णांमध्ये देखील घट होत आहे. कोरोना रूग्णांमध्ये घट होत असली तरी संपूर्ण धोका अद्याप टळलेला नाही त्यामुळे नागरिकांनी काळजी घेण्याचे आवाहन पालिकेच्या आरोग्य विभागाकडून करण्यात येत आहे. 

राज्यात 449 कोरोना रुग्णांची नोंद
मुंबईप्रमाणेच राज्यातील कोरोना रूग्णांच्या संख्येत देखील गेल्या काही दिवसांपासून घट होत आहे. आज राज्यात (Maharashtra Corona Update ) 449 नव्या कोरोना रूग्णांची नोंद झाली आहे. कालच्या पेक्षा ही संख्या कमी आहे. काल राज्यात 459 कोरोना रूग्णांची नोंद झाली होती. याबरोबरच आणखी एक दिलासादायक बाब म्हणजे आज नव्या रूग्णांपेक्षा कोरोनातून बरे झालेल्यांची संख्या जास्त आहे. आज राज्यात 538 रूग्ण कोरोनातून बरे होऊन घरी परतले आहेत. तर राज्यात आज पाच कोरोना बाधित रूग्णांच्या मृत्यूची नोंद झाली आहे. 

देशातील स्थिती (India Corona Update) 
राज्यासह देशातील कोरोना रूग्णांमध्ये देखील घट होत आहे. केंद्रिय आरोग्य मंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार गेल्या 24 तासांत देशात 3805 नवीन कोरोना रुग्ण आढळले आहेत. तर गेल्या 24 तासांत 5069 रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. देशातील सक्रिय रुग्णांची 38 हजारांवर 293 इतकी झाली आहे. देशातील सक्रिय रूग्णांची संख्या देखील राज्याप्रमाणेच घटत आहे. 

व्हाट्सप्प आइकान को दबा कर इस खबर को शेयर जरूर करें 

स्वतंत्र और सच्ची पत्रकारिता के लिए ज़रूरी है कि वो कॉरपोरेट और राजनैतिक नियंत्रण से मुक्त हो। ऐसा तभी संभव है जब जनता आगे आए और सहयोग करे

Donate Now

[responsive-slider id=1466]