ST Corporation Meeting : एसटी महामंडळाच्या प्रश्नांसंदर्भात मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत बैठक
😊 Please Share This News 😊
|
एसटी महामंडळाच्या प्रश्नांसंदर्भात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत आज मंत्रालयात बैठक आयोजित करण्यात आली आहे. दुपारी १ वाजता ही बैठक होणार आहे. कर्मचाऱ्यांचे पगार आणि तोट्यातील एसटी फायद्यात आणण्यासाठी करायच्या उपाययोजना याबाबत बैठकीत चर्चा होणार आहे. एसटी कर्मचाऱ्यांच्या पगारासाठी महामंडळाला महिन्याला अडीचशे कोटी रुपयांची गरज असते आणि सरकारकडून महामंडळाला १०० कोटी रुपयांचा निधी लागतो. त्यामुळे कर्मचाऱ्यांचा पीएफचा हप्ताही रखडला आहे. या पार्श्वभूमीवर आजची बैठक महत्त्वाची आहे.
व्हाट्सप्प आइकान को दबा कर इस खबर को शेयर जरूर करें |