Shambhuraje Desai In Pune : मुख्यमंत्र्यांच्या नातवावर उद्धव ठाकरेंनी केलेली टीका खालच्या दर्जाची; शंभूराज देसाईंकडून टीकेचा निषेध
😊 Please Share This News 😊
|
Shambhuraje Desai In Pune : मुख्यमंत्र्यांच्या नातवावर उद्धव ठाकरेंनी केलेली टीका खालच्या दर्जाची; शंभूराज देसाईंकडून टीकेचा निषेध
Shambhuraje Desai In Pune : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath shinde) यांचा दीड वर्षाचा नातवावर झालेली टीका खालच्या दर्जाची होती. शिंदे गट म्हणून आमच्यावर भरसभेत टीका करणं आम्ही समजू शकतो. आतापर्यंत त्यांनी केलेल्या अनेक टीका ऐकल्या किंवा अनेक प्रकारच्या टीका आपण रोज ऐकतो मात्र रुद्रांश शिंदेवर झालेली टीकेमुळे आम्ही अत्यंत दुखावले गेलो आहेत. शिवसेना प्रमुख उद्धव ठाकरेंकडून (Uddhav Thackeray) अशा खालच्या दर्जाच्या टीकेची अपेक्षा नव्हती. या टीकेचा मी निषेध करतो, अशी प्रतिक्रिया उत्पादन शुल्क मंत्री आणि शिंदे गटाचे नेते शंभूराज देसाई (Shambhuraje Desai) यांनी दिली आहे. ते पुण्यात बोलत होते.
‘दीड वर्षाच्या लेकराला कोणी राजकीय वादात ओढलेलं नव्हतं’
काहीही कळत नसलेल्या निरागस दीड वर्षांच्या लेकरावर अशा प्रकाऱची टीका करणं हे दुर्दैवी आहे. आतापर्यंत महाराष्ट्राने आणि देशाने राजकीय वैमनस्य पाहिले. अनेक प्रकारच्या घाणेरडे आरोप पहिलेत मात्र देशाच्या राजकारणात आतपर्यंत अशा प्रकारची टीका कधीच झाली नव्हती. दीड वर्षाच्या लेकराला कोणी राजकीय वादात ओढलेलं नव्हतं. ज्या लेकराचा कोणत्याही गोष्टीशी काहीही संबंध नाही. त्याच्या बाबतीत एकेरी भाषेत बोलणं आणि पदावर डोळा आहे, असं म्हणणं हे आम्हाला कोणालाही सहन झालेलं नाही, असं देखील ते म्हणाले.
‘आम्ही शिवसेना सोडली नाही’
शिवसेनेतर्फे कोर्टामध्ये प्रतिज्ञापत्र काय दाखल केलं याची प्रवासात असल्यानं कल्पना नाही. मात्र मी या सर्व घडामोडीमध्ये आमचे एकमेव नेते एकनाथ शिंदेंसोबत आहे. शिवाय सर्व पदाधिकारी यांनी आमचे नेते म्हणून एकनाथ शिंदे यांना नेमलं आहे. त्यामुळे आम्ही कोणीही 40 आमदार आणि खासदारांनी शिवसेना सोडली नाही. मात्र शिवसेनेचं नेतृत्व म्हणून आम्ही उद्धव ठाकरेंना नाही तर एकनाथ शिंदे यांना नेमलं आहे, असंदेखील त्यांनी स्पष्ट केलंय
‘100 दिवसात महत्वाचे निर्णय घेतले’
महाविकास आघाडीच्या काळातले 100 दिवस आणि शिंदे-फडणवीस सरकारचे 100 दिवस याचा सखोल विचार करायला हवा. आम्ही देखील ठाकरे सरकारमध्ये राज्यमंत्री होतो. मात्र त्या काळात राज्य मंत्र्यांना कोणते अधिकार होते हे आम्ही आधीच स्पष्ट केलं आहे. त्याला आम्ही नामधारी राज्यमंत्री असं म्हणू, त्या काळात फार कमी अधिकार राज्यमंत्र्यांना होते मात्र पहिल्या 100 दिवसांमध्ये शिंदे-फडणवीस सरकार आल्यापासून मोठे आणि महत्वाचे निर्णय घेण्यात आले आहेत. अनेक शेतकऱ्यांच्या गरजेसाठीचे निर्णय घेतले. पहिल्या 100 दिवसांत जवळपास 550 जीआर काढत मंदावलेल्या कामाला गती देण्याचा निर्णय शिंदे सरकारने घेतला. निवडणूक आयोगाने जर दुर्दैवाने चिन्ह गोठवलं तर एकनाथ शिंदे जो निर्णय घेतील तो आम्हाला मान्य असेल, असंही त्यांनी स्पष्ट केलं आहे.

व्हाट्सप्प आइकान को दबा कर इस खबर को शेयर जरूर करें |