DailyNews24Tas

Latest Online Breaking News

Pune News : दसऱ्याला पुणेकरांनी केली तब्बल 5000 वाहनांची खरेदी; ई-वाहनांकडे पुणेकरांचा कल

😊 Please Share This News 😊

Pune News : दसऱ्याला पुणेकरांनी केली तब्बल 5000 वाहनांची खरेदी; ई-वाहनांकडे पुणेकरांचा कल

Pune News :  दसऱ्याच्या मुहूर्तावर (Dasara) पुणेकरांनी (pune) तब्बल पाच हजाराहून अधिक वाहनांची (vehicle) खरेदी केली आहे. त्यात ई-वाहनांचादेखील (E-bike) समावेश आहे. दसऱ्याचा दिवस हा साडेतीन मुहूर्तापैकी एक असतो. त्यामुळे अनेकांच्या घरी खरेदीची लगबग होती. पुण्यातही मोठ्या प्रमाणात ही लगबग बघायला मिळाली. पुणेकरांनी यंदा दसऱ्याच्या दिवशी सोन्या बरोबरच वाहन खरेदीदेखील मोठ्या प्रमाणात केली आहे.  त्यामुळे दोन वर्षांनी जल्लोषात साजरा होणाऱ्या दसऱ्याला पुणेकरांनी चांगलाच खर्च केल्याचं दिसत आहे.

पुणे आरटीओने दिलेल्या माहितीनुसार, पुण्यात 5, 517 वाहनांची खरेदी केली आहे. त्यासंदर्भातील त्यांच्याकडे नोंदी आल्या होत्या. त्यात अनेकांनी विशेष क्रमांक घेण्यावर देखील भर दिला आहे. दसऱ्याच्या मुहूर्तावर वाहन घरी घेऊन जाण्यासाठी 27 सप्टेंबर ते 3 ऑक्टोबर दरम्यान मोठ्या प्रमाणात वाहन खरेदी केल्याची नोंद आहे. त्यामुळे वाहन खरेदीत मोठी वाढ झाल्याचं समोर आलं आहे. यात बाईक/ मोटारसायकल आणि कार या गाड्यांची जास्त प्रमाणात खरेदी झाली आहे. यात मोटार सायकल – 3490, कार – 1556,  रिक्षा – 151, गुडस – 167,  टॅक्सी – 61 ,  बस – 11 , ट्रॅक्टर – 58, रूग्णवाहिका – 02 , कन्स्ट्रक्शन वाहने – 11,  डम्पर – 02,  क्रेन – 03  एक्स्यावेटर – 03, टोईंग ट्रक – 02 यांचा समावेश आहे.

900 ई-वाहनांची खरेदी
पेट्रोल-डिझेलच्या किंमतीत सातत्याने वाढ होत असल्याने अनेकांनी ई-वाहनाकडे कल दिसत आहे. शहरात आतापर्यंत अनेकांनी ई-वाहन खरेदी केले आहे. वेगवेगळ्या कंपनीचे आणि वेगवेगळे फिचर्स असलेले ई-वाहन सध्या उपलब्ध असल्याने अनेकांनी ई-वाहनांच्या खरेदीवर भर दिला आहे. ऐरवी ई-वाहन खरेदीवर ग्राहकांचा भर असतोच मात्र दरऱ्याच्या दिवशी किंवा ऑक्टोंबर महिन्यात 556 वाहनांची नोंद झाली झाली आहे आणि 26 सप्टेंबर ते 5 ऑक्टोंबर दरम्यान सुमारे 900 ई-वाहनांची विक्री झाली आहे. यंदाच्या वर्षी यापेक्षा चांगला प्रतिसाद या ई-वाहनांना मिळेल, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे. 

एकीकडे वाहतूक कोंडी दुसरीकडे खरेदी
पुण्यात  खासगी वाहनांची संख्या प्रचंड प्रमाणात वाढली आहे. त्यामुळे प्रत्येक परिसरात वाहतूक कोंडीचं चित्र निर्माण झालं. अनेकांना स्वत:ची गाडी असणं, हे स्वप्न असतं मात्र शहराच्या दृष्टीने बघायला गेलं तर याच खासगी वाहनांमुळे पुण्यात वाहतूक कोंडी होते. घरात चार लोक असतात मात्र प्रत्येकासाठी वेगळी वाहनं खरेदी केली जातात. त्यामुळे शहरात वाहनांची संख्या वाढली आहे.

व्हाट्सप्प आइकान को दबा कर इस खबर को शेयर जरूर करें 

स्वतंत्र और सच्ची पत्रकारिता के लिए ज़रूरी है कि वो कॉरपोरेट और राजनैतिक नियंत्रण से मुक्त हो। ऐसा तभी संभव है जब जनता आगे आए और सहयोग करे

Donate Now

[responsive-slider id=1466]