DailyNews24Tas

Latest Online Breaking News

Maharashtra Politics Shivsena: शिवसेनेच्या निवडणूक चिन्हाची लढाई; निवडणूक आयोगाचे मध्यरात्रीपर्यंत कामकाज, दिले महत्त्वाचे निर्देश

😊 Please Share This News 😊

Maharashtra Politics Shivsena: शिवसेना (Shivsena) पक्ष कोणाचा, निवडणूक चिन्हं कोणाचे (Shivsena Election Symbol)याचा वाद केंद्रीय निवडणूक आयोगाकडे (Election Commission Of India) पोहचला आहे. ठाकरे आणि शिंदे गटाने निवडणूक चिन्हावर दावा केल्यानंतर निवडणूक आयोग अॅक्शन मोडमध्ये आले आहे. शिवसेनेच्या निवडणूक चिन्हासंदर्भात ठाकरे आणि शिंदे गटाने सादर केलेल्या कागदपत्रांबाबत निवडणूक आयोगाचे मध्यरात्रीपर्यंत काम सुरू होते. त्यानंतर निवडणूक आयोगाने मध्यरात्री दोन्ही गटांना पत्र पाठवले असून आज दुपारी दोन वाजेपर्यंत आपले दावे सादर करण्याचे निर्देश दिले आहेत. 

शिवसेना आणि शिंदे गटात कायदेशीर लढाई सुरू आहे. एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वातील गटाने शिवसेना पक्षावर दावा केला आहे. मुंबईतील अंधेरी पूर्व विधानसभा पोटनिवडणुकीत आपल्याच गटाला धनुष्यबाण हे चिन्हं मिळावे यासाठी निवडणूक आयोगाकडे दावा केला आहे.  शुक्रवारी, केंद्रीय निवडणूक आयोगाकडून दोन्ही बाजूने प्रतित्रापत्राचे गठ्ठे सादर करण्यात आले. मिळालेल्या माहितीनुसार, शिंदे गटाने एक लाखांच्या आसपास कार्यकर्त्यांच्या प्रतिज्ञापत्राचे गठ्ठे सादर केले आहेत. तर, ठाकरे गटाकडून सुमारे दोन लाखांच्या आसपास गठ्ठे सादर करण्यात आले. त्याशिवाय आणखी अडीच ते तीन लाख प्रतिज्ञापत्र सादर करण्यात येणार आहे. 

शुक्रवारी दोन्ही गटांकडून कागदपत्रे सादर झाल्यानंतर केंद्रीय निवडणूक आयोगाने दोन्ही गटांनी सादर केलेल्या कागदपत्रांच्या अनुषंगाने मध्यरात्रीपर्यंत काम सुरू होते. त्यानंतर केंद्रीय निवडणूक आयोगाने  रात्री बारा वाजता शिवसेनेच्या पत्राला उत्तर दिले. ठाकरे आणि शिंदे दोन्ही गटांना निवडणूक चिन्हासंदर्भात दावे आजच सादर करण्याचे आदेश निवडणूक आयोगाने दिले आहेत. आज दुपारी दोन वाजेपर्यंत चिन्हाबाबतचे दावे सादर करा अन्यथा निर्णय घ्यावा लागेल असा इशाराही निवडणूक आयोगाने दिले आहेत. दोन्ही बाजूंना आपापले दावे आयोगासोबतच एकमेकांना पाठवण्याची सूचना निवडणूक आयोगाने दिली आहे.

ठाकरे-शिंदे गटाचा दावा काय?

दरम्यान, शिवसेनेने शिंदे गटाकडून आम्हाला कागदपत्रे मिळाली नसल्याचे शुक्रवारी सांगितले होते. शिंदे गटाकडून 40 आमदार आणि 12 खासदारांच्या बळावर पक्षावर दावा करण्यात आली आहे. तर, ठाकरे गटाने पक्षाची घटना मोठी असून पक्षाची कार्यकारणी, प्रतिनिधी सभा मोठी असल्याचे सांगत पक्षावर दावा केला आहे. प्रतिनिधी सभेतील 70 टक्के सदस्य, 260 पैकी 160 सदस्य आमच्या बाजूने असल्याचा दावा ठाकरे गटाने केला आहे. 

अंधेरीतील पोटनिवडणुकीसाठी 14 ऑक्टोबरपर्यंतची मुदत आहे. पक्षाच्या अधिकृत उमेदवारीसाठी आणि निवडणूक चिन्हासाठी देण्यात येणारा ए,बी फॉर्म देण्याचा अधिकारी सध्या तरी पक्षप्रमुख म्हणून उद्धव ठाकरे यांच्याकडे आहे. तर, दुसरीकडे शिंदे गटाने पक्षाचे अध्यक्ष म्हणून एकनाथ शिंदे असल्याचे दावा प्रतित्रापत्रात केला आहे. 

निवडणूक चिन्हाचे काय होणार?

शिवसेना पक्ष कोणाचा, निवडणूक चिन्हावर कोणाचा दावा याबाबत  निवडणूक आयोग घेणार आहे. मात्र, त्यापूर्वी अंतिम निर्णय येईपर्यंत निवडणूक आयोगाकडून शिवसेनेचे धनुष्यबाण हे निवडणूक चिन्ह गोठवले जाण्याची शक्यता असल्याचे जाणकार सांगतात. निवडणूक आयोगाने याआधीच्या काही प्रकरणांमध्ये अशाच पद्धतीने निर्णय घेतल्याची उदाहरणे आहेत. निवडणूक चिन्ह गोठवल्यास उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वातील शिवसेनेला नव्या चिन्हासह निवडणुकीला सामोरे जावे लागणार आहे.

व्हाट्सप्प आइकान को दबा कर इस खबर को शेयर जरूर करें 

स्वतंत्र और सच्ची पत्रकारिता के लिए ज़रूरी है कि वो कॉरपोरेट और राजनैतिक नियंत्रण से मुक्त हो। ऐसा तभी संभव है जब जनता आगे आए और सहयोग करे

Donate Now

[responsive-slider id=1466]