DailyNews24Tas

Latest Online Breaking News

Pune news : ड्रेनेज साफसफाई करताना दोन कामगारांचा मृत्यू; रांजणगाव एमआयडीसीतील दुर्दैवी घटना

pune-news-:-ड्रेनेज-साफसफाई-करताना-दोन-कामगारांचा-मृत्यू;-रांजणगाव-एमआयडीसीतील-दुर्दैवी-घटना
😊 Please Share This News 😊

Pune news : ड्रेनेज साफसफाई करताना दोन कामगारांचा मृत्यू; रांजणगाव एमआयडीसीतील दुर्दैवी घटना

Pune News :  ड्रेनेज (drainage) साफ करताना दोन कामगारांचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. पुणे (pune) जिल्ह्यातील रांजणगाव परिसरातील एमआयडीसीमधील (Ranjangaon MIDC) फियाट कंपनीचं ड्रेनेज साफ करताना ही घटना घडली आहे. मच्छिंद्र काळे आणि सुभाष उघडे असं मृत्यू झालेल्या कामगारांची नावं आहेत. दोन्ही कामगार बीव्हीजी कंपनीसाठी मागील 18 वर्षांपासून काम करत होते. 

नेमकं काय घडलं?

रांजणगाव परिसरातील एमआयडीसीमधील फियाट कंपनीचं ड्रेनेज साफ करण्याचं काम सुरु होतं. दोघेही कामासाठी रावाना झाले होते. त्यांच्याबरोबर त्यांचे सुपरवायझरदेखील होते. काम करत असताना एका कामगाराचा पाय चुकून घसरला आणि कामगार ड्रेनेजच्या डक्टमध्ये पडला. या सगळा प्रकार पाहून सोबत असलेला दुसऱ्या कामगाराने साथीदाराला वाचवण्यासाठी डक्टमध्ये उडी मारली. यात दोघेही बुडल्याचं कळताच सुपरवायझर यांनी मदतीसाठी हाक मारली. ते कंपनीत देखील मदत मागण्यासाठी गेले. मात्र डक्ट प्रचंड प्रमाणात खोल असल्याने दोघेही लगेच बुडाले. या दोघांना बाहेर काढण्याचं काम कठीण होतं. अनेकांनी प्रयत्नांची पराकाष्ठा केली. मात्र शेवटी जेसीबीच्या साहाय्याने हा डक्ट फोडण्यात आला. डक्टमध्ये प्रचंड प्रमाणात घाण पाणी असल्याने दोघेही सापडत नव्हते. त्यांनी घाण पाणी काही प्रमाणात बाहेर काढल्यानंतर दोघांचे मृतदेह सापडले. 

या दुर्दैवी घटनेनंतर कामगारांच्या परिवारावर दु:खाचा डोंगर कोसळला आहे. ते राहत असलेल्या परिसरात हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.

चेंबरही ठरलं जीवघेणं
काही दिवसांपूर्वी वाघोलीजवळील मोझे कॉलेज रस्त्याजवळील एका सोसायटीच्या चेंबरमधे 3 कर्मचारी काम करताना अडकल्याची घटना घडली होती. यात दोन कर्मचाऱ्यांचा दुर्दैवी मृत्यू झाला होता. पीएमआरडीए अग्निशमन जवानांनी दोघांना गंभीर अवस्थेत बाहेर काढले होते.  ही घटना कळताच पीएमआरडीए वाघोली अग्निशमन केंद्राचे जवान घटनास्थळी पोहचले होते आणि त्यांनी दोरीचा आधार घेत दोघांना बाहेर काढलं होतं. सुदैवाने तिसरा कर्मचारी बचावला होता.  

कामगाराच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर 
साफसफाई कर्मचाऱ्यांच्या सुरक्षेचा प्रश्न नेहमीच समोर येत असतो. या सगळ्या घटनांमुळे कामगारांच्या सुरक्षेचा मुद्दा पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे. त्यामुळे कामगारांचा जीव जाऊ नये यासाठी संबंधित संस्थांनी पुढाकार घेण्याची गरज आहे. कामगारांना योग्य ती उपकरणं आणि सुरक्षेसंदर्भात सूचना देणं गरजेचं आहे. 

व्हाट्सप्प आइकान को दबा कर इस खबर को शेयर जरूर करें 

स्वतंत्र और सच्ची पत्रकारिता के लिए ज़रूरी है कि वो कॉरपोरेट और राजनैतिक नियंत्रण से मुक्त हो। ऐसा तभी संभव है जब जनता आगे आए और सहयोग करे

Donate Now

[responsive-slider id=1466]