DailyNews24Tas

Latest Online Breaking News

मुंबईतील हजारो मुलं मधुमेह, उच्च रक्तदाबाच्या विळख्यात; मनपा शाळेतील सर्वेक्षणानंतर धक्कादायक वास्तव उजेडात

मुंबईतील-हजारो-मुलं-मधुमेह,-उच्च-रक्तदाबाच्या-विळख्यात;-मनपा-शाळेतील-सर्वेक्षणानंतर-धक्कादायक-वास्तव-उजेडात
😊 Please Share This News 😊

Maharashtra Mumbai News : डायबिटीज् (Diabetes) आणि ब्लडप्रेशर (High Blood Pressure) या आजारांनी संपूर्ण जगाला विळखा दिला आहे. पण यासंदर्भातील धक्कादाय बाब म्हणजे, आता लहान मुलांमध्येही मधुमेह आणि उच्च रक्तदाब यांसारख्या समस्या उद्भवत असल्याचं पाहायला मिळत आहे. याचसंदर्भातील एक धक्कादायक आकडेवारी समोर आली आहे. मुंबई महापालिकेच्या शाळांमधील एक दोन नव्हे, तब्बल 13 हजार मुलांना डायबेटीस आणि ब्लडप्रेशर असल्याचं धक्कादायक वास्तव समोर आलं आहे.  

धकाधकीचं जीवन आणि बदललेली जीवनशैली यांमुळे आपल्यापैकी बरेचजण आरोग्याच्या विविध समस्यांनी त्रासलेले आहेत. त्यापैकी मधुमेह आणि उच्च रक्तदाब ही दुखणी तर अनेकांना आयुष्यभरासाठी जडली आहेत. पण प्रामुख्यानं वयाच्या चाळीशीत जडणारे आजार आता लहान मुलांमध्येही दिसून येत आहेत. घड्याळाच्या काट्यावर धावणाऱ्या मुंबईत लाखो मुंबईकर डायबिटीज, ब्लडप्रेशरने त्रासलेले असताना आता मुंबईतील लहान मुलंही या आजारांच्या विळख्यात अडकत चालली आहेत. 

मुंबई महापालिकेतर्फे शाळांमधील विद्यार्थ्यांच्या आरोग्यासाठी अनेक उपक्रम राबवले जातात. यामध्ये विद्यार्थ्यांच्या आरोग्याची नियमितपणे तपासणी केली जाते. याच उपक्रमातून धक्कादायक वास्तव समोर आलं आहे. मुंबई महानगरपालिका शाळांतील 8 हजार 158 विद्यार्थ्यांना उच्च रक्तदाब, तर 5 हजार 328 विद्यार्थ्यांना मधुमेह असल्याचं पालिकेतर्फे राबवण्यात आलेल्या तपासणी अहवाल समोर आलं आहे. 

मुंबई महापालिकेनं कशी केली तपासणी : 

  • रक्तदाबसाठी 2 लाख 82 हजार 919 विद्यार्थ्यांची तपासणी केली होती. यामध्ये 8 हजार 158 विद्यार्थ्यांना उच्च रक्तदाब असल्याचं समोर आलं. 
  • मधुमेहासाठी एकूण 2 लाख 71 हजार 583 हजार विद्यार्थ्यांची तपासणी करण्यात आली होती. यामध्ये 5 हजार 328 विद्यार्थ्यांना मधुमेह असल्याचं समोर आलं आहे.

मुंबई महापालिकेनं सप्टेंबर 2022 पासून आतापर्यंत केलेल्या विद्यार्थ्यांच्या आरोग्य तपासणीचा अहवाल समोर आला आहे. यातून ही धक्कादायक माहिती उजेडात आली आहे. त्यामुळे पालकांनी सतर्क होऊन आपापल्या मुलांची काळजी घेणं गरजेचं आहे. मुलांना ताण-तणावापासून दूर ठेवाव. तसेच प्रामुख्यानं मुलांच्या आहारावर लक्ष द्याव, त्यांना सकस आणि संतुलित आहार द्यावा. तसेच, त्यांना व्यायामाची सवय लावावी, असं आवाहनही मुंबई महापालिकेकडून पालकांना करण्यात आलं आहे. 

महत्त्वाच्या इतर बातम्या : 

Cancer Research: कीमो, रेडिओथेरपीपेक्षा वेगळं, पण खात्रीशीर इलाज; ‘या’ तंत्रानं कॅन्सर दूर होणार!

व्हाट्सप्प आइकान को दबा कर इस खबर को शेयर जरूर करें 

स्वतंत्र और सच्ची पत्रकारिता के लिए ज़रूरी है कि वो कॉरपोरेट और राजनैतिक नियंत्रण से मुक्त हो। ऐसा तभी संभव है जब जनता आगे आए और सहयोग करे

Donate Now

[responsive-slider id=1466]