Mumbai Local : मध्य रेल्वेवर 27 तासांचा मेगाब्लॉक, मुख्य जनसंपर्क अधिकारी शिवाजी सुतार माझावर
😊 Please Share This News 😊
|
उद्यापासून मध्य रेल्वेवर २७ तासांचा मेगाब्लॉक घेण्यात येणार आहे.. सीएसएमटी-मशीद रोड रेल्वे स्थानक दरम्यान धोकादायक कर्नाक उड्डाणपुलाचे पाडकाम सुरु करण्यात येणार आहे. या कामानिमित्त मध्य रेल्वे मुख्य आणि हार्बर मार्गावरील १ हजार ९६ लोकल फेऱ्या रद्द करण्यात आल्यात.. या काळात अनेक मेल आणि एक्स्प्रेस गाड्याही रद्द करण्यात आल्यात… कर्नाक पुलाच्या कामासोबत कोपरी पुलाच्या कामासाठीही वाहतुकीत बदल करण्यात आलेत.. गर्डर टाकण्याचे काम शनिवारी-रविवारी मध्यरात्री करण्यात येणार आहे. या कामामुळे सध्या वापरात असलेल्या दोन्ही बाजूंच्या पुलांवरील वाहतूक बंद करण्यात येणार आहे. त्यामुळे नाशिक-मुंबई आणि मुंबई-नाशिक या दोन्ही मार्गिकांवरील वाहतूक पर्यायी मार्गाने वळवण्यात आलीय.
व्हाट्सप्प आइकान को दबा कर इस खबर को शेयर जरूर करें |