DailyNews24Tas

Latest Online Breaking News

Sanjay Raut : महाराष्ट्रात पुन्हा परिवर्तनाची तयारी सुरू, संजय राऊतांचं सूचक वक्तव्य

😊 Please Share This News 😊

Sanjay Raut : आदित्य ठाकरेंच्या (Aaditya Thackeray) दौऱ्याकडे बिहारचा (Bihar) दौरा म्हणून बघू नका. ते शिवसेनेचे प्रमुख नेते आहेत. या दौऱ्याकडं राष्ट्रीय दौरा म्हणून बघा, त्याला राष्ट्रीय दौरा म्हणून महत्व दिलं पाहिजे असं वक्तव्य शिवसेना खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी केलं. तेजस्वी यादव (Tejashwi Yadav) यांनी बिहारमध्ये नितीश कुमारांच्या मदतीनं परिवर्तन घडवून आणलं. अडीच वर्षापूर्वी आम्ही देखील महाराष्ट्रात परिवर्तन केलं होतं. आता पुन्हा महाराष्ट्रात परिवर्तन करण्याची तयारी सुरू झाल्याचं सूचक वक्तव्य राऊतांनी केलं. राज्यातील सरकार हे कमजोर असल्याचेही ते म्हणाले. संजय राऊतांनी त्यांच्या निवासस्थानी प्रसारमाध्यमांशी संवाद साधला, त्यावेळी त्यांनी शिंदे सरकारवर टीका केली. 

भाजपच्या नेत्यांनी आदित्य ठाकरेंची माफी मागावी

दिशा सालियन प्रकरणी ज्या भाजपच्या नेत्यांनी आदित्य ठाकरे यांच्यावर आरोप केले आहेत, त्यांनी माफी मागावी असेही संजय राऊत म्हणाले. तुम्ही आरोप केलेत तर आता माफी मागा. तुम्ही आत्तापर्यंत एका तरुण नेत्याला का बदनाम करत होता? असा सवालही संजय राऊतांनी केला. दरम्यान, महाराष्ट्रात पुढच्या दोन महिन्यात काय होईल हे सांगता येत नाही, असं केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवेंनी सांगितल्याचे राऊत म्हणाले. पडद्यामागे ज्या हालचाली सुरु आहेत, त्याबाबतच्या काही गोष्टी रावसाहेब दानवे यांच्यापर्यंत गेल्या असतील असेही राऊत म्हणाले.   

सुरक्षेच्या मुद्यावरुन संजय राऊतांची सरकारवर टीका

सुरक्षेच्या मुद्यावरुनही संजय राऊतांनी सरकारवर टीका केली. सरकार माझ्या जीवाशी खेळत आहे. पण काहीही झालं तरी मी सरकारकडे सुरक्षा मागणार नसल्याचे राऊत म्हणाले. कोणत्या नियमाने आणि भूमिकेनं तुम्ही सुरक्षा काढली? असा सवालही राऊतांनी केला. आमच्या जीवाला जर काही बर वाईट झालं तर हे सरकार जबाबदार असेल असेही राऊत यावेळी म्हणाले. हे सगळ सुडबुद्धीनं सुरु आहे. सुरक्षा नाही म्हणून आम्ही दबावानं काम कराव यामुळं हे सगळं सुरु आहे. पण आम्ही काम करत राहू असे राऊत म्हणाले. कोणाला मुंबई तोडायचीय तर कोणाला महाराष्ट्राचे जिल्हे आणि गावं तोडायची आहेत. गेल्या साडेतीन महिन्यापासून महाराष्ट्र कुरतडण्याचं काम सुरु असल्याचे म्हणत राऊतांनी राज्य सरकारवर जोरदार टीका केली. राज्यातील सरकार जर लवकरात लवकर घालवलं नाहीतर राज्याचे पाच तुकडे केल्याशिवाय केंद्र सरकार आणि त्यांचे हस्तक राहणार नाहीत असेही राऊत म्हणाले. 

महत्त्वाच्या बातम्या:

Sanjay Raut : राज्य सरकार कमजोर आणि हतबल, लवकरात लवकर सरकार घालवलं नाहीतर….संजय राऊतांचा हल्लाबोल

व्हाट्सप्प आइकान को दबा कर इस खबर को शेयर जरूर करें 

स्वतंत्र और सच्ची पत्रकारिता के लिए ज़रूरी है कि वो कॉरपोरेट और राजनैतिक नियंत्रण से मुक्त हो। ऐसा तभी संभव है जब जनता आगे आए और सहयोग करे

Donate Now

[responsive-slider id=1466]