DailyNews24Tas

Latest Online Breaking News

Measles Updates: गोवरची लक्षणं, कारणं आणि प्रतिबंधित उपचार; तज्ज्ञांनी दिली महत्त्वाची माहिती

😊 Please Share This News 😊

Measles Updates: गोवर (Measles Latest Updates) हा संसर्गजन्य आजार आहे. गोवर आजार संक्रमित व्यक्तीशी संपर्कामुळे अथवा संक्रमित वस्तू हाताळल्यामुळे पसरतो. गोवरसाठी कोणतेही विशिष्ट उपचार किंवा विषाणूविरोधी औषधं उपलब्ध नाहीत, व्हिटॅमिन ‘ए’ चा पूरक आहार आजारपणात प्रतिकारशक्ती वाढवण्यास उपयुक्त आहे. सध्या राज्यात गोवरचा वाढता प्रादुर्भाव आहे. या आजाराशी अनेक प्रश्न पालकांच्या मनात आहेत. याच सर्व प्रश्नांची उत्तरं नवी मुंबईतील अपोलो हॉस्पिटलमधील बाल-संसर्गजन्यरोग सल्लागार डॉ. धन्या धर्मपालन यांनी दिली आहेत. 

गोवर म्हणजे काय?

गोवर हा एक सांसर्गिक विषाणूजन्य आजार आहे, ज्यामुळे लक्षणीयरित्या मृत्यू होतात आणि विकृती देखील उद्भवते. जेव्हा संक्रमित व्यक्ती खोकते, शिंकते किंवा श्वास घेते तसेच वायूवीजन (हवेतील बारीक कण) श्वासाद्वारे आत घेतले जाते, तेव्हा गोवरचा प्रसार होतो.

गोवरची लक्षणं आणि कारणं?

बऱ्याचदा पूर्व अवस्थेत म्हणजे गोवरचे पुरळ दिसण्यापूर्वी 4-5 दिवस आधीच गोवरचा प्रसार होतो. गोवरच्या संपर्कात आल्यानंतर 7 ते 14 दिवसांच्या आत विषाणू संपूर्ण शरीरात प्रतिरुपित होतात आणि ताप, खोकला, पू-स्राव न होता डोळे लाल होऊन नाक वाहत राहते. कधीकधी उलट्या किंवा जुलाब होऊ शकतात. गालाच्या आतील भागात, विशेषतः खालच्या द्विदल दातांच्या समोर विशिष्ट पद्धतीचे 1 मिमीचे पांढरे ठिबके दिसतात ज्यास, कोप्लिक स्पॉट म्हणतात. पुरळ आल्यावर 72 तासांनंतर नाहिसे होतात. गोवर पुरळाचे लाल ठिपके आधी चेहऱ्यावर दिसू लागतात आणि नंतर 3 दिवसांत खाली धड, हात आणि पायांवर पसरतात. 3 दिवसांनंतर पुरळ जातात आणि तपकिरी किंवा तांबड्या रंगाचे डाग दिसून येतात. गोवरमध्ये न्यूमोनिया हे मृत्यूचे प्रमुख कारण आहे आणि हा रोग दुय्यम सूक्ष्म रोगजंतूच्या संसर्गामुळे देखील उद्भवू शकतो. जे कुपोषित आहेत आणि ज्यांची रोगप्रतिकारक्षमता कमी आहे, त्यांना गोवरचा तीव्र त्रास होऊ शकतो.

गोवरचे निदान?

प्रयोगशाळेत रक्तामध्ये गोवरचे विशिष्ट आयजीएम प्रतिपिंड आढळून आल्यावर निदान केले जाते (पुरळ आल्यानंतर सुमारे 2 दिवसांनी कळते). रोगजंतू शोध पीसीआरद्वारे घशातील स्वॅब आणि लघवीच्या नमुन्यांवरुन देखील घेतला जाऊ शकतो.

गोवर रोखण्यासाठी लसीकरण महत्वाचं आहे का?  

गोवर योग्य प्रकारे प्रतिबंधित केला जाऊ शकतो. गोवर-रुबेला (एमआर) लस (9 आणि 16 महिन्यांत दिली जाते) म्हणून रुबेला (जर्मन गोवर) विरुद्ध संयोजनात नियमित लसीकरण कार्यक्रमांतर्गत गोवरची लस उपलब्ध आहे. इंडियन अकॅडमी ऑफ पेडियाट्रिक्सने एमएमआर लस घेण्याची शिफारस केली आहे, ज्यामध्ये 9 महिने, 15 महिने आणि 5 व्या वर्षी गालगुंडाच्या लसीचा देखील समावेश आहे. गोवर रोखण्यासाठी दोन डोस खूप प्रभावी आहेत. जर एखाद्या मुलाला नमूद केलेल्या वयात लस दिली गेली नसेल तर गुंतागुंत टाळण्यासाठी लसीकरण लवकरात लवकर केलं पाहिजे.

महत्त्वाच्या इतर बातम्या : 

आता गोवरसाठी क्वारंटाईन! गोवर नियंत्रणासाठी विलगीकरण व्यवस्था करा, टास्क फोर्सचे जिल्हा प्रशासन आणि महापालिकांना निर्देश

व्हाट्सप्प आइकान को दबा कर इस खबर को शेयर जरूर करें 

स्वतंत्र और सच्ची पत्रकारिता के लिए ज़रूरी है कि वो कॉरपोरेट और राजनैतिक नियंत्रण से मुक्त हो। ऐसा तभी संभव है जब जनता आगे आए और सहयोग करे

Donate Now

[responsive-slider id=1466]