DailyNews24Tas

Latest Online Breaking News

Mumbai Metro: मुंबई मेट्रो 3 प्रकल्पाच्या भुयारीकरणाचं काम पूर्ण, कामातील अडथळे अन् वाढलेल्या खर्चाला जबाबदार कोण? 

😊 Please Share This News 😊

Mumbai Metro News : मुंबईतील मेट्रो 3 च्या भुयारीकरणाचं काम काल 100 टक्के पूर्ण झालं आहे. कारशेडच्या वादात अडकलेल्या मेट्रो 3 या मुंबईतल्या महत्त्वाच्या प्रकल्पाला आता गती मिळाली आहे. 2021 ची डेडलाईन असलेला हा प्रकल्प 2024 च्या मध्यापर्यंत पूर्ण करून मेट्रो 3 लाईन पूर्णपणे सुरू करण्याचा प्रयत्न आहे. मेट्रो 3 प्रकल्पाचे काम कितपत पूर्ण झालाय? या प्रकल्पात आतापर्यंत कोणकोणते अडथळे आले ? या प्रकल्पाला झालेल्या विलंबामुळे किती कोटींचा जादाचा खर्च करावा लागणार? या प्रकल्पातील पुढचे टप्पे नेमके कोणते असणार? या प्रश्नांची उत्तरं जाणून घेऊयात…

कुलाबा बांद्रा सीप्ज मेट्रो 3 या देशातील सर्वात लांब आणि पहिल्या भुयारी मेट्रो प्रकल्पाच्या भुयारीकरणाचे काम 100 टक्के पूर्ण झाला आहे. मागील पाच वर्षापासून जवळपास 17 टनेल बोरिंग मशीन च्या साह्याने सुरू असेल ही भुयारी करण्याचं काम अखेर काल पूर्ण झालं. काल महालक्ष्मी मेट्रो स्टेशन ते मुंबई सेंट्रल मेट्रो स्टेशन दरम्यान 827 मीटर लांबीच्या भुयारी करण्याचं आव्हानात्मक काम रॉबिनच्या टनेल बोरिंग मशीन तानसा 1 ने यशस्वीरित्या पूर्ण केला. त्यामुळे आता या प्रकल्पाचा 77 टक्के काम पूर्ण झाल्याच मुंबई मेट्रो रेल कॉर्पोरेशनच्या व्यवस्थापित संचालक अश्विनी भिडे यांनी सांगितले.

भुयारी करण्याचं काम शंभर टक्के पूर्ण झाल्याने उर्वरित काम जून 2024 पर्यंत पूर्ण करून मेट्रो 3 ची संपूर्ण लाइन सुरू करण्याचा प्रयत्न केला जाणार आहे.

कसे असणार मेट्रो 3 प्रकल्पाचे पुढील टप्पे ?

मेट्रो 3 लाइन ही 33.5 किमीची असून एकूण 27 मेट्रो स्थानक आहे, त्यातील 26 मेट्रो स्थानक ही अंडरग्राउंड आहेत

डिसेंबर 2023 पर्यंत आरे ते बीकेसी स्टेशन दरम्यान साडेअकरा किलोमीटरची फेज 1 लाइन सुरू केली जाईल.

यासाठी मेट्रोच्या विविध मेट्रोच्या चाचण्या या लाईनवर घेतल्या जात आहेत.

फेज 1 मध्ये एकूण 9 गाड्या सुरवातीला चालवण्यात येणार असल्याचं नियोजन आहे

फेज 2 बीकेसी ते कफ परेड हा जून 2024 पर्यंत पूर्ण करून संपूर्ण मेट्रो 3 लाईन सुरू करण्याचा प्रयत्न राहील 
 
मात्र जो प्रकल्प 2021 मध्ये पूर्ण होणार होता तो प्रकल्प अडथळ्यांची शर्यत पार करत तीन वर्ष विलंबाने सुरू होतो आहे.

त्याआधी ज्याने बारा ते पंधरा हजार कोटी रुपयांनी खर्च वाढतोय. 
  
मेट्रो 3 प्रकल्पात आतापर्यंत आलेले अडथळे 

2019 मध्ये आरे मध्ये मेट्रो 3 कारशेडसाठी झाडं कापल्यानंतर पर्यावरणवादी, राजकीय पक्षांनी मेट्रो तीन कारशेड आरेमध्ये करण्यास विरोध केला.

याच दरम्यान सत्तेत असलेल्या भाजप सेनेमध्ये मेट्रो तीन प्रकल्पाचे कारशेड आरेमध्ये करण्याच्या मुद्यावर मतभेद सुरू झाले. शिवसेनेने आरे कारशेड विरोध केला.

नोव्हेंबर 2019 मध्ये महाविकास आघाडी सरकार आल्यानंतर आरेमधील मेट्रो 3 कारशेडचे काम थांबविण्यात आले

तत्कालीन सरकारकडून मेट्रो तीन कारशेड साठी पहाडी गोरेगाव, बीकेसी कांजुरमार्ग यासारख्या पर्यायी जागांचा विचार करण्यात आला, यासंबंधी अहवाल मागवण्यात आले

ऑक्टोबर 2020 महाविकास आघाडी सरकारने मेट्रो 3 चे कार शेड हे कांजूरमार्ग येथे हलवण्याचा निर्णय घेतला

मात्र, त्यानंतर कांजूरमार्गच्या त्या जागेवर केंद्र सरकारने आपली मालकी असल्याचा फलक लावला आणि जमिनीच्या मालकी हक्कावरून हा पर्याय कायदेशीर, न्यायालयीन कचाट्यात अडकला

त्यामुळे मेट्रो 3 कारशेडचे काम पूर्णपणे थांबले असताना शिंदे फडणवीस सरकारने जुलै 2022 मध्ये आरेमधील मेट्रो 3 कारशेड कामाची स्थगिती उठवली आणि जलद गतीने कामाला सुरुवात केली

खरंतर मेट्रो 3 हा प्रकल्प 2021 मध्ये पूर्ण होणार होता मात्र ज्या प्रकारे सर्व अडथळे मेट्रो तीन कारशेड संदर्भात निर्माण झाले. त्यामुळे या प्रकल्पाला मोठा विलंब झाला आणि या प्रकल्पाचे काम तीन वर्ष पुढे गेलं. त्यामुळे मेट्रो तीन प्रकल्पाचा खर्च सुद्धा मोठ्या प्रमाणावर वाढला. 23 हजार कोटींमध्ये होणारे या प्रकल्पाचा खर्च आता 13 ते 15 कोटींनी वाढला आहे. त्यामुळे साधारणपणे 35 ते 38 हजार कोटी हा प्रकल्प पूर्ण करण्यासाठी लागतील असा अंदाज आहे.

या सगळ्या प्रकल्पामध्ये होणारा श्रेय वाद, पक्षीय राजकारण, सत्तांतर झाल्यानंतर बदलले जाणारे निर्णय. याचा मोठा आर्थिक फटका हा प्रकल्प पूर्ण करताना बसला आहे. यामध्ये मुंबईकरांचे हजारो कोटी रुपये वाया गेले आहेत. मात्र याला जबाबदार कोण? कोणामुळे आर्थिक फटका बसलाय? याचे उत्तर मुंबईकरांना देताना सुद्धा राजकारण्यांकडून चिखलफेक केली जात आहे.

त्यामुळे भुयारीकरणाचं शंभर टक्के काम आणि मेट्रो तीन प्रकल्पाचे 76 टक्के पूर्ण झालेले काम हे मुंबई मेट्रो रेल कॉर्पोरेशनचा आत्मविश्वास वाढवणारं आहे. कारण अडथळ्यांची शर्यत पार करत ते काम इथपर्यंत येऊन पोहोचले. आता या प्रकल्पाला झालेला विलंब आणि त्यात मुंबईकरांचे वाया गेले हजारो कोटी रुपयांचा हिशोब राजकारणांनी द्यावा, किमान याची जबाबदारी तरी घ्यावी आणि तातडीने मेट्रो 3 सेवेत आणावी हीच अपेक्षा आहे.

व्हाट्सप्प आइकान को दबा कर इस खबर को शेयर जरूर करें 

स्वतंत्र और सच्ची पत्रकारिता के लिए ज़रूरी है कि वो कॉरपोरेट और राजनैतिक नियंत्रण से मुक्त हो। ऐसा तभी संभव है जब जनता आगे आए और सहयोग करे

Donate Now

[responsive-slider id=1466]