DailyNews24Tas

Latest Online Breaking News

Zika Virus Pune : पुणेकरांनो काळजी घ्या! 67 वर्षीय व्यक्तीला झिका व्हायरसची लागण

😊 Please Share This News 😊

Zika Virus Pune : पुणेकरांनो काळजी घ्या! 67 वर्षीय व्यक्तीला झिका व्हायरसची लागण

Zika Virus Pune : पुण्यात आता झिका व्हायरसचा रुग्ण (Zika Virus) आढळला आहे. एका 67 वर्षीय व्यक्तीला झिका व्हायरसची लागण झाली आहे. त्यांना जहांगीर रुग्णालयात दाखल करण्यात आले असून त्यांची प्रकृती सुधारत आहे. हे व्यक्ती पुण्यातील बावधन परिसरातील रहिवासी आहे. जपानी मेंदूज्वरानंतर झिका व्हायरचा रुग्ण आढळल्याने महापालिकेचा ताण वाढण्याची शक्यता आहे. 

16 नोव्हेंबर 2022 ला 67 वर्षीय रुग्णाला पुण्यातील जहांगीर रुग्णालयात उपचारासाठी आणण्यात आलं होतं. त्यावेळी त्यांना ताप, खोकला, थकवा आणि सांधेदुखीचा त्रास होता. त्यामुळे या कारणांसाठी बाह्यरुग्ण विभागात वैद्यकीय सल्ल्यासाठी हा व्यक्ती आला होता. त्यानंतर या रुग्णाची तपासणी करण्यात आली. खाजगी प्रयोगशाळेत रुग्ण 18 नोव्हेंबर 2022 झिका बाधित असल्याचे सिद्ध झालं होतं. त्यानंतर 30 नोव्हेंबर 2022 रोजी एनआयव्ही पुणे यांच्या तपासणीत रुग्ण झिका बाधित असल्याचे निश्चित झाले. 22 नोव्हेंबरला पुणे महानगरपालिकेच्या वतीने या भागात रोग नियंत्रण उपाययोजना करण्यात आली.

रुग्णाच्या परिसरातील घरांचे सर्वेक्षण करण्यात आले आणि त्यात एकही संशयित रुग्ण आढळला नाही. या भागात घरोघरीकरण्यात आले. त्यावेळी या भागात एडीस डास असल्याचं आढळलं नाही. या भागात धूरफवारणी देखील करण्यात आली आहे.

रुग्ण पुण्यातला नसून मुळचा नाशिकचा
मिळालेल्या माहितीनुसार, झिका बाधित रुग्ण हा मूळचा नाशिकचा आहे. ते 6 नोव्हेंबर रोजी पुण्यात आले होते. त्यापूर्वी ऑक्टोबर 22 ला ते सूरत येथे गेले होते. सध्या हा रुग्ण पूर्णपणे बरा झाला आहे आणि त्यांना कोणतीही लक्षणे नाहीत, असं अधिकाऱ्यांनी सांंगितलं आहे. या पार्श्वभमूीवर पुणे शहर आणि बावधन परिसरातील ताप रुग्ण सर्वेक्षण आणि कीटकशास्त्रीय सर्वेक्षण अधिक वेगाने करण्यात आले आहे.

काय आहे झिका आजार?
पुण्यात झिका व्हायरल आढळल्याने महापालिकेचे धाबे दणाणले आहे. खबरदारीच्या उपाययोजनासाठी महापालिका तयारीला लागली आहे. झिका विषाणू आजार हा एडिस इजिप्ती डासांमुळे होणारा सौम्य स्वरुपाचा आजार असून या आजारात 80 टक्के रुग्णांमध्ये कोणतीही लक्षणे आढळून येत नाहीत. इतर रुग्णांमध्ये ताप, सांधेदुखी, अंगदुखी, डोकेदुखी, डोळे लाल होणे, उलटी होणे, अस्वस्थता जाणवणे ताप, अंगावर पुरळ उठणे अशी लक्षणे आढळतात. झिका आणि इतर कीटकजन्य आजारासाठी सर्वेक्षण सक्षम करत असतानाच कोरोना सर्वेक्षण आणि लसीकरण याकडे दुर्लक्ष होणार नाही, याबाबत दक्षता घेण्याबाबत सर्व संबंधितांना आरोग्य विभागाने निर्देश दिले आहेत.

ही बातमी देखील वाचा

Zika Virus: झिका व्हायरसची महाराष्ट्रात एन्ट्री! काय आहेत या आजाराची लक्षणं, काय घ्यावी काळजी

व्हाट्सप्प आइकान को दबा कर इस खबर को शेयर जरूर करें 

स्वतंत्र और सच्ची पत्रकारिता के लिए ज़रूरी है कि वो कॉरपोरेट और राजनैतिक नियंत्रण से मुक्त हो। ऐसा तभी संभव है जब जनता आगे आए और सहयोग करे

Donate Now

[responsive-slider id=1466]