DailyNews24Tas

Latest Online Breaking News

Pune news : धर्मांतर करण्यासाठी पत्नीला मारहाण; 2001 पासून मानसिक त्रास, पतीविरोधात पुण्यात गुन्हा दाखल

😊 Please Share This News 😊

Pune news : धर्मांतर करण्यासाठी पत्नीला मारहाण; 2001 पासून मानसिक त्रास, पतीविरोधात पुण्यात गुन्हा दाखल

Pune Crime news : ख्रिश्चन धर्म स्वीकारण्यासाठी पत्नीला पतीकडून मारहाण होत असल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. पुण्यातील येरवडा परिसरात ही घटना घडली आहे. रविंदरसिंह भंवरसिंह राजपुरोहित असं 43 वर्षीय पतीचं नाव आहे. या प्रकरणी पतीवर येरवडा पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.  पोलिसांंनी दिलेल्या माहितीनुसार, रविंदरसिंह भंवरसिंह राजपुरोहित यांनी स्वत: खिश्चन धर्म स्वीकारला होता. त्यानंतर मागील 21 वर्षांपासून ते पत्नी आणि मुलांनी खिश्चन धर्म स्वीकारण्यासाठी पत्नीला त्रास देत होता. त्याने काही दिवसांपूर्वी घरातील चक्क घरातील मूर्ती आणि फोटो नदीत टाकून दिले होते. या सगळ्या प्रकाराला वैतागून अखेर पत्नीने पोलिसांत धाव घेतली.  43 वर्षाच्या पत्नीने येरवडा पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. त्यानुसार पोलिसांनी पतीविरोधात गुन्हा दाखल केला आहे. 

हा प्रकार 2001 पासून सुरु होता
पती राजपुरोहित याने 2001 मध्ये खिश्चन धर्म स्वीकारला. तेव्हापासून पत्नीने आणि तिच्या आईवडिल मुलांनी खिश्चन धर्म स्वीकारावा, यासाठी तो शारीरीक आणि मानसिक त्रास देत होता. पत्नीला आणि घरच्यांना हाताने मारहाण करत होता. तसंच मुलाला खिश्चन धर्माच्या शाळेत टाकेल अशी धमकी देत होता. त्याने घरातील देवाच्या मूर्ती आणि फोटो नदीत टाकून फिर्यादी यांच्या धार्मिक भावना दुखावल्या. या सगळ्या त्रासाला कंटाळून कुटुंबियांनी पोलिसांत धाव घेतली आहे. पोलीस पुढील तपास करत आहेत.

मुलाला खिश्चन धर्माच्या शाळेत टाकेल अशी धमकी
या दोघांची मुलं पुण्यातील नामवंत शाळेत शिक्षण घेत आहेत. मात्र घरातील तणावाच्या वातावरणाचा त्यांच्यावर देखील परिणाम होत आहे. घरात आईला मारहाण होत असल्याने मुलांच्या मानसिकतेवर देखील त्याचा मोठा परिणाम झाला आहे. या सगळ्याचा त्रास मुलांना होत आहे. मुलांच्या शिक्षण सुरळीत सुरु असताना त्यांना मुलाला खिश्चन धर्माच्या शाळेत टाकेन, अशी धमकी वारंवार रविंदरसिंह भंवरसिंह राजपुरोहित मुलांना देत होते, असं पत्नीनं दिलेल्या तक्रारीत नमूद केलं आहे.

येरवडा पोलिसांकडून तत्काळ कारवाई
सध्या धर्मांतराचे प्रकार अनेक शहरात घडत असल्याचं समोर आलं आहे. मात्र अनेकांना धर्म बदलायचा नसल्याने अशाप्रकारच्या घटना घडत आहेत. त्यांना धमकी देत किंवा जबरदस्ती करत धर्मांतर करायला आता कुटुंबीयच भाग पाडत असतात. त्यामुळे या प्रकरणाचा खोलात तपास सुरु आहे. महिलेची तक्रार येताच सदर पतीविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असल्याचं पोलिसांनी सांगितलं आहे. 

व्हाट्सप्प आइकान को दबा कर इस खबर को शेयर जरूर करें 

स्वतंत्र और सच्ची पत्रकारिता के लिए ज़रूरी है कि वो कॉरपोरेट और राजनैतिक नियंत्रण से मुक्त हो। ऐसा तभी संभव है जब जनता आगे आए और सहयोग करे

Donate Now

[responsive-slider id=1466]