Pune Weather : दुपारी ऊन तर रात्री थंडी; पुणेकरांसाठी डिसेंबर महिना थंडीचा
😊 Please Share This News 😊
|
Pune Weather : दुपारी ऊन तर रात्री थंडी; पुणेकरांसाठी डिसेंबर महिना थंडीचा
Pune Weather : पुणे शहरात थंडीचा कडाका (winter) वाढत आहे. शिवाजीनगर परिसरात रात्रीचे तापमान बुधवारी 14.3 अंशांवरून शुक्रवारी 11.1 अंश सेल्सिअसपर्यंत घसरलेले पाहायला मिळाले. त्यामुळे पुणेकर दिवसा ऊन आणि रात्री गुलाबी थंडी अनुभवत आहेत. 4 डिसेंबरपर्यंत रात्रीचे तापमान 12 अंश सेल्सिअसच्या आसपास राहण्याची शक्यता असल्याचं भारतीय हवामानशास्त्र विभागाने सांगितलं आहे.
शुक्रवारी पाषाण येथे रात्रीचे तापमान 11 अंश सेल्सिअस, चिंचवड येथे 16.7 अंश सेल्सिअस, लवळे येथे 17.5 अंश सेल्सिअस, मगरपट्टा येथे 17.4 अंश सेल्सिअस होते. तर शुक्रवारी शहरात दिवसाचे तापमान 31.6 अंश सेल्सिअस नोंदवले गेले म्हणजे नेहमीपेक्षा 1.9 अंश सेल्सिअस जास्त आणि रात्रीचे तापमान शुक्रवारी सामान्यपेक्षा 1.5 अंश सेल्सिअस थंड होते.
दिवसाचे तापमान 31 अंश सेल्सिअसच्या आसपास असेल. आकाश निरभ्र राहण्याची शक्यता आहे आणि त्यामुळे शहरात थंड हवामान असेल. या वेळी रात्रीचे तापमान 12 ते 13 अंश सेल्सिअस असू शकते. दुपारी भरपूर ऊन आणि रात्री थंड वातावरण असणार आहे, असं पुण्याच्या हवामान अंदाज विभागाचे प्रमुख अनुपम कश्यपी यांनी सांगितलं आहे. त्यामुळे पुणेकरांना ऊन आणि थंडी दोन्ही अनुभवायला मिळत आहे.
अनेक ठिकाणी शेकोट्या
हिवाळ्याची सुरुवात होताच आता शहरात अनेक परिसरात रात्री शेकोट्या दिसत आहेत. अनेक रस्त्यांवर किंवा घराच्या अंगणात पुणेकर थंडी अनुभवत आहेत. थंडीमुळे शहरात रात्री लवकरच शुकशुकाट व्हायला सुरुवात होते. रस्त्यांवर गाड्यांचं प्रमाण देखील कमी असतं. त्यामुळे वाहतूक कोंडीचा प्रश्न काही दिवसांपासून कमी झाल्याचं चित्र आहे. मात्र दिवसभर पुणेकरांना चांगल्याच उष्ण वातावरणाला सामोरं जावं लागत आहे. दिवसभर ऊन सावल्यांचं खेळ बघायला मिळत आहे. थंडी वाढल्याने शहरात थंडीच्या कपड्यांचा नवा ट्रेन्डही बघायला मिळत आहे. कॉलेजमध्येही थंडीच्या सीझनमधील कपड्यांचा ट्रेन्ड बघायला मिळत आहे.
राज्यभरात थंडी
शुक्रवारी मुंबईतील सांताक्रूझमध्ये महाराष्ट्रातील सर्वाधिक कमाल तापमान 34.2 अंश सेल्सिअस नोंदवले गेले होते तर औरंगाबादमध्ये राज्यातील सर्वात कमी किमान तापमान 10.8 अंश सेल्सिअस नोंदवले गेले. हवामान खात्याच्या अंदाजानुसार डिसेंबरमध्ये राज्यातील बहुतांश भागात रात्री थंड राहण्याची शक्यता आहे. हवामान शास्त्रज्ञांच्या मते, जेव्हा उत्तरेकडे बर्फवृष्टी होते आणि भारताच्या दक्षिणेकडील भागात थंड वारे वाहतात तेव्हा महाराष्ट्रात तापमान कमी होते, असंही त्यांनी सांगितलं आहे.

व्हाट्सप्प आइकान को दबा कर इस खबर को शेयर जरूर करें |