Pune Crime : दहावीतील विद्यार्थ्याने संपवलं जीवन, मुख्याध्यापकांनी अपमान केल्याचा आरोप
😊 Please Share This News 😊
|
Pune Crime : दहावीतील विद्यार्थ्याने संपवलं जीवन, मुख्याध्यापकांनी अपमान केल्याचा आरोप
दहावीतील विद्यार्थ्याला आत्महत्येस प्रवृत्त केल्याच्या आरोपावरून थेट मुख्याध्यापकावर गुन्हा दाखल करण्यात आलाय. पिंपरी चिंचवडमध्ये ही धक्कादायक घटना घडली आहे. आयुष गारळे असं आत्महत्या केलेल्या विद्यार्थ्याचे नाव होते. आयुष अभ्यास करत नाही, म्हणून शाळेतून काढून टाकेन, दहावीच्या परीक्षेत हक्काचे 20 गुण देणार नाही, दहावीच्या परीक्षेला ही बसू देणार नाही. अशी धमकी मुख्याध्यापक हितेश शर्मा देत होते. असा त्यांच्यावर आरोप आहे. आयुष दिघी येथील प्रियदर्शनी इंग्लिश मिडीयम स्कुलमध्ये दहावीच्या वर्गात शिक्षण घेतो. त्याच दहा डिसेंबरला मुख्याध्यपकांनी याबाबत आयुषबाबत आईकडे तक्रार केली…वरील सर्व बाबी त्यांच्या ही कानावर टाकल्या. त्यामुळं आयुष टेन्शनमध्ये होता. अशातच 13 डिसेंबरला घरातील सगळे बाहेर गेले, तेव्हा एकटाच घरी असणाऱ्या आयुषने गळफास घेत आयुष्य संपवलं. या मृत्यूला मुख्याध्यापक जबाबदार असल्याचा आरोप कुटुंबीयांनी केलाय. त्याच आधारावर भोसरी पोलिसांनी मुख्याध्यापक शर्मा यांच्यावर 24 डिसेंबरला कलम 305 नुसार गुन्हा दाखल केलाय. मात्र पोलिसांनी अद्याप मुख्याध्यापक शर्मांवर कोणतीही कारवाई केली नाही..

व्हाट्सप्प आइकान को दबा कर इस खबर को शेयर जरूर करें |