DailyNews24Tas

Latest Online Breaking News

आजपासून रामाच्या नवरात्रीला सुरूवात, काय आहे महत्त्व?

😊 Please Share This News 😊

चैत्र महिन्यातील शुक्ल पक्षाच्या नवव्या तिथीला रामनवमी साजरी केली जाते. या दिवशी भगवान विष्णूचा सातवा अवतार असलेल्या मर्यादा पुरुषोत्तम प्रभू श्री राम यांचा राजा दशरथाच्या घरी जन्म झाला.

Ram Navratra
आजपासून रामाच्या नवरात्रीला सुरूवात

चैत्र शुद्ध प्रतिपदेला म्हणजेच गुढीपाडव्याला रामाच्या नवरात्राला सुरुवात होते.

देवीच्या नवरात्रासारखीच सरळ सोपी पूजा असते. पूजेच्याही आधी वातावरणात जो उत्साह भरलेला असतो त्याने मन प्रसन्न होते. अनेक ठिकाणी रामाची पालखी निघते. राम मंदिरात नवरात्राचा उत्साह मोठ्या प्रमाणात पाहायला मिळतो.

पुढे नऊ दिवस सकाळ संध्याकाळ आरती, रामरक्षा, प्रसाद असतो आणि नवमीला रामजन्म. अशा पद्धतीने हे नवरात्र पार पडते.

हिंदू नववर्ष चैत्र महिन्यापासून सुरू होते. या महिन्यात नवरात्रीत नऊ दिवस शक्ती साधना केली जाते. चैत्र नवरात्रीच्या नवव्या दिवसाला विशेष महत्त्व आहे कारण या दिवशी श्रीरामाचा जन्म झाला होता.

चैत्र महिन्यातील शुक्ल पक्षाच्या नवव्या तिथीला रामनवमी साजरी केली जाते. या दिवशी भगवान विष्णूचा सातवा अवतार असलेल्या मर्यादा पुरुषोत्तम प्रभू श्री राम यांचा राजा दशरथाच्या घरी जन्म झाला.

2023 मध्ये चैत्र नवरात्रीला 22 मार्च 2023 पासून सुरुवात होत आहे. चला जाणून घेऊया रामनवमी कधी साजरी केली जाईल,

पूजेचा शुभ मुहूर्त.

राम नवमी 2023 तारीख

नवीन वर्षात चैत्र महिन्यातील शुक्ल पक्षातील नवमी तिथी म्हणजेच 30 मार्च 2023 रोजी रामनवमीचा सण साजरा केला जाईल. या दिवशी राम मंदिरात भजन, कीर्तन, मिरवणूक काढली जाते. हिंदूंसाठी या सणाला विशेष महत्त्व आहे. संपूर्ण भारतात हा उत्सव मोठ्या थाटामाटात साजरा केला जातो, परंतु अयोध्येतील रामजन्मभूमीचे सौंदर्य वेगळे आहे.

राम नवमी 2023 मुहूर्त

पंचांगानुसार चैत्र महिन्यातील शुक्ल पक्षातील नवमी तिथी 29 मार्च 2023 रोजी रात्री 9.07 वाजता सुरू होत आहे. 30 मार्च 2023 रोजी रात्री 11.30 वाजता नवमी तिथी समाप्त होईल.

 

व्हाट्सप्प आइकान को दबा कर इस खबर को शेयर जरूर करें 

स्वतंत्र और सच्ची पत्रकारिता के लिए ज़रूरी है कि वो कॉरपोरेट और राजनैतिक नियंत्रण से मुक्त हो। ऐसा तभी संभव है जब जनता आगे आए और सहयोग करे

Donate Now

[responsive-slider id=1466]