हिंगोली जिल्ह्यातील संत नामदेव यांचे जन्मस्थान असलेल्या संस्थानाच्या विश्वस्त मंडळाच्या संदर्भात
😊 Please Share This News 😊
|
दिल्ली:
हिंगोली जिल्ह्यातील संत नामदेव यांचे जन्मस्थान असलेल्या संस्थानाच्या विश्वस्त मंडळाच्या संदर्भात आज सर्वोच्च न्यायालयात सुनावणी पार पडली. संत नामदेव संस्थानाच्या विश्वस्त मंडळाची नियुक्ती करताना धर्मदाय आयुक्तांनी कोणालाही विश्वासात न घेता केली असा आरोप याचिकाकर्ते सतीष इडोळकर आणि शाहूराव देशमुख यांनी केला होता. या संदर्भात आज सर्वोच्च न्यायालयात सुनावणी पार पडली. यावर न्यायालयाने विश्वस्त मंडळ बर्खास्त करण्याचा निर्णय दिला आहे. तसंच नवीन विश्वस्त मंडळ येत्या सहा महिन्यात स्थापन करण्याचे आदेश दिले आहेत.
सर्वोच्च न्यायालयाचे न्यायाधीश हेमंत गुप्ता यांच्या अध्यक्षतेखाली खंडपीठाचा निर्णय.
वर्तमान सदस्यांना सर्वोच्च न्यायालयाने केले बरखास्त.
आगामी सहा महिन्यात नवीन सदस्यांना नियुक्त करण्याचा दिला आदेश.
धर्मदाय आयुक्तांनी यापूर्वी तहसीलदारांना केले होते अध्यक्ष म्हणुन नियुक्त. सोबतच स्थानिक स्वराज संस्थेला डावलून केले होते सदस्य नियुक्त.
धर्मादाय आयुक्तांचा निर्णय सर्वोच्च न्यायालयाने फिरवला.
बाईट
Adv राजसाहेब पाटील…
व्हाट्सप्प आइकान को दबा कर इस खबर को शेयर जरूर करें |