DailyNews24Tas

Latest Online Breaking News

पुणे रेल्वे स्थानकावर चेंगराचेंगरी, एका प्रवाशाचा मृत्यू

😊 Please Share This News 😊

पुणे रेल्वे स्थानकावर चेंगराचेंगरी, एका प्रवाशाचा मृत्यू

Pune News Update : पुणे रेल्वे स्थानकावर चेंगराचेंगरी झालीय. या चेंगराचेंगरीत पुणे-दानापूर एक्सप्रेसमध्ये चढणाऱ्या एका प्रवाशाचा मृत्यू झालाय. पोलिस घटनास्थळी दाखल झाले आहेत. नक्की ही घटना कशामुळे घडली  याचा पोलिस तपास करत आहेत.  

दीपावलीनिमित्त गावी जाण्यासाठी पुणे रेल्वे स्थानकावर आज मोठ्या प्रमाणात गर्दी झाली होती. रात्री सव्वा नऊ वाजण्याच्या आसपास एक नंबरच्या प्लॅटफॉर्मवर पुण्याहून दानापूरच्या दिशेने जाणारी गाडी आली. गाडी येताच स्थानकावरील प्रवाशांनी गाडीत चढण्यासाठी एकच गर्दी केली. त्यातच एक प्रवाशी खाली पडला. परंतु, खाली पडलेल्या प्रवाशाला उचलण्याऐवजी लोक त्याला चेंगरून रेल्वेत चढले. यात त्या प्रवाशाचा जागीच मृत्यू झाला अशी प्राथमिक माहिती मिळाली आहे.  मृत्यू झालेला प्रवासी अगोदरच आजारी होता. त्यात त्याला उपचारासाठी घेऊन जात असताना त्याचा मृत्यू झाला, अशी माहिती पुणे रेल्वेच्या जनसंपर्क अधिकाऱ्यांनी दिली आहे.  

दरम्यान,  दिवाळीच्या काळातील वाढती प्रवाशांची संख्या लक्षात घेता, चोरीच्या तसेच अन्य घटना घडू नये यासाठी रेल्वेकडून विशेष काळजी घेतली जात आहे. रेल्वे स्थानकांसह रेल्वे गाडीत देखील गस्त वाढवण्यात आली आहे. लोहमार्ग (रेल्वे) पोलिसांनी दामिनी पथकासह एक विशेष पथक रेल्वेत कार्यरत केले आहे. पुढचे काही दिवस पुणे स्थानकावरून सुटणाऱ्या विविध रेल्वेमध्ये हे कर्मचारी काम करणार आहेत.  पुणे रेल्वे स्थानकांवरून प्रवास करणाऱ्या प्रवाशांची संख्या जास्त आहे.  पुणे स्थानकावरून रोज सुमारे दीड ते पावणे दोन लाख  प्रवास करत असतात.  दिवाळीत ही संख्या तीन लाखांच्या पुढे जाते. त्यामुळे वाढच्या गर्दीमुळे चोरीच्या किंवा इतर  घटना घडू नये यासाठी रेल्वेकडून विशेष काळजी घेतली जात आहे. खास दीपावलीनिमित्त होणाऱ्या गर्दीचा विचार करून आरपीएफने अतिरिक्त 30 जवानांची नियुक्ती केली आहे.  लोहमार्ग पोलिसांनी देखील मुख्यालयाकडून 30 पेक्षा जास्त  पोलिसांची कुमक मागवली आहे.  

महत्वाच्या बातम्या

Pune Fire: सदाशिव पेठमधील हॉटेलला भीषण आग, दहा वर्षाच्या मुलीचा होरपळून मृत्यू 

व्हाट्सप्प आइकान को दबा कर इस खबर को शेयर जरूर करें 

स्वतंत्र और सच्ची पत्रकारिता के लिए ज़रूरी है कि वो कॉरपोरेट और राजनैतिक नियंत्रण से मुक्त हो। ऐसा तभी संभव है जब जनता आगे आए और सहयोग करे

Donate Now

[responsive-slider id=1466]