बारामतीत वाहतूक कोंडी सोडवण्यासाठी चक्क प्रतिभा पवार उतरल्या रस्त्यावर…!
😊 Please Share This News 😊
|
बारामतीत वाहतूक कोंडी सोडवण्यासाठी चक्क प्रतिभा पवार उतरल्या रस्त्यावर…!
Baramati Traffic Issue: बारामतीत वाहतूक कोंडीने शहरातील नागरिकांसह बाहेरुन येणारे नागरिकही त्रस्त झाले आहेत. ही वाहतूक कोंडी सोडवण्यासाठी खुद्द प्रतिभा पवार (Pratibha Pawar) रस्त्यावर उतरल्याचा एक फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. बारामती शहरात वारंवार होणाऱ्या वाहतूक कोंडीने नागरिकांना हैराण केले असून पोलीस प्रशासन, आरटीओ आणि नगरपालिका या वाहतूक कोंडीवर मात करण्यास अपयशी ठरत आहेत.
या वाहतूक कोंडीचा फटका खुद्द प्रतिभा पवार यांनाही बसला. बारामती शहरातून प्रशासन भवनमार्गे कसब्याकडे निघालेल्या असताना प्रतिभा पवार यांची गाडी वाहतूक कोंडीत अडकली. दहा ते पंधरा मिनिटे वाहतूक कोंडी दूर होत नसल्याचे पाहून स्वतः प्रतिभा पवार गाडीतून खाली उतरल्या आणि त्यांनी वाहतूक सुरळीत करण्याच्या दृष्टीने वाहनचालकांना सूचना दिल्या. हा फोटो मागच्या 2-3 दिवसातील असल्याचं बोललं जातं आहे. वाहतूक नियंत्रण करण्यासाठी प्रतिभा पवार रास्तावर उतरल्यानंतर बारामती शहर पोलिसांनी तातडीने हालचाल करून येथील वाहतूक कोंडी दूर केली.
दिवाळीच्या निमित्ताने सर्व पवार कुटुंबातील सदस्य एकत्र येत असतं. गेल्या 2-3 दिवसापासून पवार कुटुंबातील सर्व बारामतीत वास्तव्यास आहेत. पवार कुटुंबियांना शुभेच्छा देण्यासाठी आणि शुभेच्छा स्विकारण्यासाठी राज्यभरातून लोक बारामतीत उपस्थित होत असतात.
बारामतीतील मुख्य चौक असलेला तीन हत्ती चौकात पुलाचे काम सुरु आहे. त्यामुळे चारचाकी वाहनांना रिंग रोडचा वापर करावा लागत असल्याने मुख्य चौकात वाहतूक कोंडी होत आहे.
मोठ्या संख्येने नागरीक दिवाळीच्या खरेदीसाठी बाहेर पडत आहेत. त्यामुळे वाहतूक कोंडी होत आहे. तसेच बारामतीचे बस स्टॅण्डचे काम सुरू आहे. त्यामुळे स्टॅण्ड तात्पुरते कसबा या ठिकाणी हलवण्यात आलं आहे.
त्यामुळे बारामतीतील कारभारी चौक, शिवाजी चौक आणि ढवाण पाटील चौकात ट्रॅफिक जाम होत आहे.. आणि वाहतूकीस अडथळा निर्माण होत आहे.. शिवाजी चौक, ढवाण पाटील चौक आणि कारभारी चौक हे एकाच रास्तावर असल्याने या चौकातील अंतर 300 ते 400 मी असल्याने मोठी वाहतूक कोंडी होत आहे.
सामान्य नागरिकांना रोज या वाहतूक कोंडीचा फटका बसतोच. आता पवार कुटुंबातील महत्वाच्या व्यक्तिला देखील या वाहतूक कोंडीमुळं फटका बसला आहे. प्रतिभा पवार यांचा हा फोटो खूप मोठ्या प्रमाणात व्हायरल होत असल्याचं पाहायला मिळतंय.
ही बातमी देखील वाचा-
Bharat Jodo Yatra: ‘समाजात एकोपा निर्माण करण्याचा प्रयत्न’, भारत जोडो यात्रेत शरद पवार होणार सहभागी

व्हाट्सप्प आइकान को दबा कर इस खबर को शेयर जरूर करें |