DailyNews24Tas

Latest Online Breaking News

कल्याणचा अभिषेक MPSCत राज्यात प्रथम क्रमांक, पाच हजार मुलांमधून बाजी

😊 Please Share This News 😊

kalyan News: कल्याण वालधुनी परिसरात राहणाऱ्या अभिषेकने महाराष्ट्र लोकसेवा आयोगातर्फे (MPSC) घेण्यात आलेल्या सहायक मोटार वाहन निरीक्षक मुख्य परीक्षेत यश संपादन करत राज्यातून प्रथम क्रमांक पटकावला आहे. अभिषेकच्या यशामुळे कल्याणचा नावलौकिक वाढला असून त्याच्यावर सर्वच स्तरातून कौतुकाचा वर्षाव होत आहे.

कल्याण पश्चिम वालधुनी परिसरात भास्कर सालेकर पत्नी श्रध्दा सालेकर हे मुलगा अभिषेक सोबत राहतात. भास्कर सालेकर आणि श्रद्धा सालेकर हे शिक्षक आहेत. अभिषेकने दहावीच्या परीक्षेत 96 टक्के गुण मिळवत शाळेत प्रथम क्रमांक मिळवत आपल्या गुणांची चुणूक दाखवली होती. त्यानंतर अभिषेकने मागे वळून पाहिलेच नाही. 

मुळातच आई वडील दोन्ही शिक्षक असल्याने  घरातूनच शिक्षणाचं बाळकडू अभिषेकला मिळालं होतं. लहानपणापसून आपले आजोबा मुकुंद दामले यांच्याकडे पाहून आपणही त्यांच्यासारखं सरकारी अधिकारी बनून जनसेवा करावी अशी इच्छा अभिषेकची होती. आजोबा मुकुंद हे बीएआरसीमध्ये अधिकारी पदावर कार्यरत होते. त्यांच्यासारखाच अधिकारी बनण्याचे स्वप्न बाळगत अभिषेकने जिद्दीने अभ्यासाकडे लक्ष केंद्रीत केलं. बीए मॅकेनिकलपर्यंत शिक्षण घेत त्यानंतर एमपीएससी स्पर्धा परीक्षांची  तयारी सुरू केली. मार्च 2020 मध्ये त्याने परीक्षेची पहिली पायरी चढला. मात्र कोरोनाने खो घातला आणि लॉकडाऊन लागलं आणि परीक्षा लांबणीवर गेली.मात्र अभिषेकने हिम्मत हारली नाही. 

परीक्षेची तयारी सुरूच ठेवली. त्याचबरोबर खाजगी कंपनीत नोकरी सुरू केली. एमपीएससीच्या परीक्षा जाहीर झाल्या. एमपीएससीची परिवहन विभागातील सहाय्यक मोटर वाहक निरीक्षक पदासाठी ही परीक्षा होती. नोव्हेंबर 2021 मध्ये ही परीक्षा होणार होती. अभिषेकने दिवसातील 13 तास अभ्यास केला. अभिषेकला त्याचे शिक्षक आई वडिलांची साथ मार्गदर्शन मिळत होते. 21 तारखेला अभिषेकच्या वाढदिवसाच्या निकालाच्या दिवशीच निकाल जाहीर झाला. 

आपण चांगल्या मार्कने उत्तीर्ण होणार अशा विश्वास अभिषेक आणि त्यांच्या कुटुंबीयांना होता, मात्र राज्यात प्रथम क्रमांक मिळेल असे वाटले नव्हते. तब्बल पाच हजार मुलं परीक्षेला बसली होती. त्यातून अभिषेकने बाजी मारली. अभिषेकच्या यशानंतर त्याचे सर्वच स्तरातून कौतुक होतंय.  या यशाबद्दल बोलताना अभिषेक याने नियमित आणि नियोजनबद्ध अभ्यासामुळे हे यश मिळाले. आपल्या यशाचे श्रेय आपले आई-वडिलांना आहे. ते शिक्षक असून त्यांनी लहानपणापासूनच आपल्याला विविध स्पर्धा परीक्षांसाठी प्रोत्साहित केले. त्या अनुभवाचा फायदा नक्कीच झाल्याचे त्याने सांगितले. कोकणातील खेड तालुक्यातील मुंबके गावातील आमच्या घराण्यातील तिसरी पिढी प्रशासकीय सेवेत दाखल होताना विशेष आनंद होत आहे. आजवर मार्गदर्शन करणाऱ्या सर्व गुरुजनांचे त्याने आभार मानले.

व्हाट्सप्प आइकान को दबा कर इस खबर को शेयर जरूर करें 

स्वतंत्र और सच्ची पत्रकारिता के लिए ज़रूरी है कि वो कॉरपोरेट और राजनैतिक नियंत्रण से मुक्त हो। ऐसा तभी संभव है जब जनता आगे आए और सहयोग करे

Donate Now

[responsive-slider id=1466]