Ameya Khopkar : ‘…मी घरात घुसून मारेन’ शिवसेना नेत्यांना खोपकरांचा दम
😊 Please Share This News 😊
|
शिवसेना ठाकरे गटाचे नेते माझ्यावर खालच्या पातळीवर टीका करत असतील तर मी त्यांना घरात घुसून मारेन, अशी धमकी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे नेते अमेय खोपकर यांनी दिली आहे. अमेय खोपकर यांच्या एका ट्विटमुळं या वादाची ठिणगी नुकतीच पडली होती. हिंदूच्या सणांचा त्रास होत असेल तर हिंदूद्वेष्ट्या मुस्लिमांनी मुंबईच नव्हे तर देश सोडून जावं असं वादग्रस्त विधान अमेय खोपकर यांनी केलं होतं. या विधानानंतर त्यांच्यावर चौफेर टीका झाली होती. परंतु त्यानंतरही आपण आपल्या विधानावर ठाम असल्याचे त्यांनी पत्रकार परिषदेत स्पष्ट केलं आहे.
व्हाट्सप्प आइकान को दबा कर इस खबर को शेयर जरूर करें |