DailyNews24Tas

Latest Online Breaking News

गौतमी पाटील म्हणतेय, लावणीच्या कार्यक्रमात आम्हालाही प्रेक्षकांनी लाठ्या मारल्या, आम्ही सुखरुप बचावलो

गौतमी-पाटील-म्हणतेय,-लावणीच्या-कार्यक्रमात-आम्हालाही-प्रेक्षकांनी-लाठ्या-मारल्या,-आम्ही-सुखरुप-बचावलो
😊 Please Share This News 😊

गौतमी पाटील म्हणतेय, लावणीच्या कार्यक्रमात आम्हालाही प्रेक्षकांनी लाठ्या मारल्या, आम्ही सुखरुप बचावलो

Gautami Patil : लावणीच्या कार्यक्रमातील गर्दीचा त्रास जसा ग्रामस्थांना झाला तसा आम्हाला देखील झाला. आम्हालाही प्रेक्षकांनी लाठ्या मारल्या. या सगळ्यातून आम्ही सुखरुप बचावलो, असा खुलासा इन्स्टास्टार गौतमी पाटील(Gautami Patil) हिने केला आहे. लावणीच्या कार्यक्रमाला एवढी गर्दी होईल असं वाटलं नव्हतं मात्र प्रचंड प्रमाणात लोकांनी गर्दी केली होती. त्यात एका वयस्कर माणासाच मृतदेहदेखील आढळला. याचं मला प्रचंड वाईट वाटत आहे. लहान गावात एवढी गर्दी अपेक्षित नव्हती. मला कार्यक्रमासाठी बोलवण्यात आलं होतं. त्यासाठी मी गावात गेले होते. मी माझं काम केलं, असं स्पष्टीकरण देखील इन्स्टास्टार गौतमी पाटील हिने दिलं आहे. सांगलीच्या (Sangli) मिरज तालुक्यातील बेडग गावात तिच्या कार्यक्रमात प्रेक्षकांनी गोंधळ घातल्याचा प्रकार घडला. त्यावर तिने स्पष्टीकरण दिलं आहे. 

चाहत्यांता उत्साह पडला भारी
बेडग इथल्या एका मंडळाच्या वतीने वेगवेगळ्या क्षेत्रात उत्कृष्ट सेवा बजावणाऱ्या आणि बेडग गावचे नाव देशात गाजवणार्‍या मानकऱ्यांचा सत्कार समारंभाचे आयोजन करण्यात आलं होतं. त्यानंतर सोशल मीडिया स्टार गौतमी पाटील हिच्या नृत्याचा कार्यक्रम ठेवण्यात आला होता. नृत्याचा कार्यक्रम सुरु झाला. तिचं नृत्य पाहण्यासाठी जिल्ह्यातून आणि बाहेरुन तिचे चाहते आले होते. कार्यक्रमाच्या वेळी शाळेच्या पटांगणात तुफान गर्दी झाल्याने काही प्रेक्षक हे शाळेच्या कौलारु छतावर जाऊन नृत्याचा ताल धरु लागल्याने कौलांचा चुराडा झाला. तार जाळीच्या कम्पाऊंडचेही मोठं नुकसान झालं. त्याचबरोबर ज्या झाडावर प्रेक्षक बसले होते ते झाडदेखील मुळासह कोसळलं.

शाळेच्या नुकसानीला जबाबदार कोण?

मिरज तालुक्यातील बेडग येथील जिल्हा परिषद मराठी मुलांची शाळा येथे पटांगणात लावणी कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. या लावणीच्या कार्यक्रमासाठी मोठी गर्दी जमली होती. त्यामुळे मैदान कमी पडले. त्यानंतर काही प्रेक्षकांकडून जिल्हा परिषद शाळेच्या छतावर चढून कार्यक्रम पाहण्याचा प्रयत्न केला मात्र यात  जिल्हा परिषद शाळेच्या कौलारू छताचा चुराडा झाला. शाळेच्या झालेल्या या नुकसानीस कोण जबाबदार?, असा सवाल आता ग्रामस्थांतून उपस्थित केला जात आहे.

सोशल मीडियास्टार आहे गोतमी पाटील
गौतमी पाटील ही सोशल मीडियावर ओळखीचा आणि प्रसिद्ध चेहरा आहे. आपला डान्स आणि एक्स्प्रेशन्सने गौतमीने तरुणाईला वेड लावलं आहे. 26 वर्षीय गौतमी ही डान्सर असून लावणी डान्सर म्हणून तिला ओळखलं जातं. यूट्यूब, इन्स्टाग्राम, फेसबुक यांसारख्या सोशल प्लॅटफॉर्मवर तिचे व्हिडीओ तुफान व्हायरल होत असतात.

व्हाट्सप्प आइकान को दबा कर इस खबर को शेयर जरूर करें 

स्वतंत्र और सच्ची पत्रकारिता के लिए ज़रूरी है कि वो कॉरपोरेट और राजनैतिक नियंत्रण से मुक्त हो। ऐसा तभी संभव है जब जनता आगे आए और सहयोग करे

Donate Now

[responsive-slider id=1466]