DailyNews24Tas

Latest Online Breaking News

Sambhajiraje Chhatrapati : राज्यपालांच्या विरोधात जागोजागी महाराष्ट्र बंदचा प्रवास सुरु झालाय; संभाजीराजेंचा इशारा

😊 Please Share This News 😊

Sambhajiraje Chhatrapati : राज्यपालांच्या विरोधात जागोजागी महाराष्ट्र बंदचा प्रवास सुरु झालाय; संभाजीराजेंचा इशारा

Sambhajiraje bhosale : राज्यपाल भगतसिंह कोश्यारी (Bhagatsingh Koshyari) यांच्या विरोधात महाराष्ट्र बंद (Maharashtra Bandh) करण्याचा प्रवास सुरु झाला आहे, असा इशारा माजी खासदार संभाजीराजे छत्रपती (sambhajiraje chatrapati) यांनी दिला आहे. पिंपरी चिंचवड आणि जालनाने बंद यशस्वी करून याची सुरुवात केली आहे. पिंपरी- चिंचवडमध्ये (Pimpari Chinchwad News) पुकारण्यात आलेल्या बंदमध्ये स्वतः संभाजीराजे सहभागी झाले होते. त्यावेळी ते बोलत होते. छत्रपती शिवरायांना जे मानत नाहीत, त्यांचा कडेलोट होतो. याची सर्वांना कल्पना आहे, असंही संभाजीराजेंनी म्हटलं आहे. छत्रपती शिवाजी महाराजांविषयी (chhatrapati shivaji maharaj) वादग्रस्त वक्तव्य करणारा राज्यपाल आम्हाला नको आहे. त्यांना हवं तिथं पाठवून द्या, असं म्हणत त्यांनी राज्यपालांवर संताप व्यक्त केला आहे. 

शिंदे-फडणवीस सरकारने राज्यपालांची हकालपट्टी केली नाही, तर महाराष्ट्र बंद करण्याशिवाय पर्याय उरणार नाही. या बंदचा प्रवास पिंपरी आणि जालनामधून सुरू झाल्याचा इशारा संभाजीराजेंनी दिला आहे. छत्रपती शिवाजी महाराज यांच्याबद्दल वारंवार राज्यपाल आणि भाजपचे नेते वादग्रस्त वक्तव्य करत आहेत. या प्रकरणी राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांची महाराष्ट्रातून हकालपट्टी करावी. छत्रपती शिवरायांबाबत वेळोवेळी वादग्रस्त वक्तव्य करणं, हे एक षडयंत्र आहे का? असा प्रश्न संभाजीराजे यांनी उपस्थित केला आहे. 

दिलगिरी व्यक्त केली तरीही मानणार नाही
महाराष्ट्रात जेवढे महापुरुष आहेत, तेवढे महापुरुष दुसऱ्या कोणत्याही राज्यात नाहीत. मात्र आपल्या राज्यात त्या महापुरुषांबद्दल अवमानकारक वक्तव्य केली जातात, ही मोठी शोकांतिका आहे. छत्रपती शिवाजी महाराज ही एक अस्मिता आहे. त्यामुळेच प्रत्येक व्यक्ती शिवरायांना मानतो. शिवाजी महाराजांबद्दल ज्यांनी एकदा नाही दोनदा अवमानकारक भाषा केली, त्या राज्यपालांनी साधी दिलगिरी सुद्धा व्यक्त केली नाही, एवढी मग्रुरी आहे. आता राज्यपालांनी दिलगिरी व्यक्त केली तरीही मानणार नसल्याचं त्यांनी खडसावून सांगितलं आहे. 

पिंपरी आणि जालनाने बंद यशस्वी केले
राज्यपालांनंतर तीन व्यक्तींनी छत्रपतींचा अवमान केला. किती दिवस हे सहन करायचे. पक्षाच्या पुढे महाराज आहेत. हे बघा आणि एकत्र या. महाराष्ट्र बंदचा माझ्यावर दबाव होता पण लोकांना वेठीस धरायला नको म्हणून मी घोषणा केली नाही. पण पिंपरी आणि जालनाने बंद कसे यशस्वी करावेत हे दाखवून दिलं आहे. आज दोन पक्षाचे लोक पिंपरीच्या बंदमध्ये सहभागी नाहीत. मी जर त्या पक्षांशी निगडित असतो तरीही पक्षाचा दबाव झुगारून या मंचावर आलो असतो, असं म्हणत त्यांनी विरोधकांवर टीका केली आहे. 

ही बातमी देखील वाचा

व्हाट्सप्प आइकान को दबा कर इस खबर को शेयर जरूर करें 

स्वतंत्र और सच्ची पत्रकारिता के लिए ज़रूरी है कि वो कॉरपोरेट और राजनैतिक नियंत्रण से मुक्त हो। ऐसा तभी संभव है जब जनता आगे आए और सहयोग करे

Donate Now

[responsive-slider id=1466]