DailyNews24Tas

Latest Online Breaking News

Measles Disease : गोवरचा उद्रेक! राज्यात आतापर्यंत 17 बालकांचा मृत्यू; तर 14,880 संशयित रूग्ण

😊 Please Share This News 😊

Measles Disease : राज्यात गोवरचा उद्रेक कमी न होता वाढतंच चालला आहे. शहरात तर गोवर संसर्ग पोहोचलाच आहे मात्र, आता गावामध्येही गोवर संसर्ग झालेले रूग्ण वाढू लागले आहेत. त्यामुळे राज्यात चिंता वाढू लागली आहे. काल राज्यात गोवरचा उद्रेक 101 पटींनी वाढला होता. आज हा आकडा 121 वर पोहोचला आहे. तर, 14 हजार 880 संशयित रूग्ण आढळले आहे. गोवरची वाढती रूग्णसंख्या पाहून 14 डिसेंबर रोजी गोवर संदर्भात राज्यव्यापी वेबिनारचे आयोजन करण्यात येणार आहे. यामध्ये राज्य टास्क फोर्समधील तज्ज्ञ मंडळी गोवर संदर्भात मार्गदर्शन करणार आहेत. 

राज्यातील गोवरची स्थिती काय आहे? 

मागील चार वर्षांची राज्याची गोवरची परिस्थिती पाहता यावर्षी म्हणजेच 2022 या वर्षातील गोवरची परिस्थिती फारच चिंताजनक झाली आहे. 2019 मध्ये गोवरचा उद्रेक तीन पटींनी झाला होता. तर, 2020 मध्ये गोवरचा उद्रेक दोन पटींवर होता. 2021 मध्ये तर गोवर बाधित रूग्णांची संख्या आतापर्यंतची सर्वात कमी म्हणजेच एक पटींनी वाढली होती. 2022 मध्ये गोवर आजाराने कहरच केला आहे. ही संख्या आता 121 पटींनी वाढली आहे. 

गोवर संसर्गाची लक्षणे कोणती? (Symptoms of Measles Infection) :

गोवर हा विषाणूमुळे होणारा संसर्गजन्य आजार आहे. हा लसीकरणामुळे टाळता येणारा आजार आहे. गोवर हा आजार मुख्य करून पाच वर्षांखालील मुलांमध्ये आढळतो. गोवर आजारात सुरुवातीला तीव्र ताप येणे, खोकला, सर्दी अशी लक्षणे अशी लक्षणे आढळून येतात. तर, दुसऱ्या आणि तिसऱ्या दिवशी साधारण लालसर पुरळ अंगावर येण्यास सुरुवात होते. काही मुलांना जुलाब, उलटीचा सुद्धा त्रास होतो. हा ताप साधारण पाच ते सात दिवस अंगावर राहतो. यामध्ये काही मुलांना तीव्र श्वसनदाह, न्यूमोनिया, मेंदूवर सूज, एन्केफेलायटीस, अंधत्व, अशा समस्या उद्भवू शकतात. तसेच, यामध्ये मुलं दगावण्याची सुद्धा भीती असते. 

संसर्ग टाळण्यासाठी कशी काळजी घ्याल? 

या आजारावर अत्यंत प्रभावी अशी MR आणि MMR अशी लस गव्हर्मेंट आणि प्रायव्हेट क्षेत्रामध्ये उपलब्ध आहे. सर्व बालकांना या लसीचे दोन डोस देण्यात येतात. 9 महिने आणि 15 महिने वयोगटात या आजाराचे दोन डोस देण्यात येतात. त्याचबरोबर सेफ ड्रिकींग वॉटर, अजीवनसत्वाची मात्रा, सकस आहार, कुपोषण, कुपोषणावरील उपचार अशी उपाययोजना करून आपण ही साथ थांबवू शकतो. 

महत्त्वाच्या बातम्या : 

Kolhapur Municipal Corporation : 15 ते 25 डिसेंबर गोवर आणि रुबेला लसीकरण विशेष मोहीम; प्रशासक डॉ.कादंबरी बलकवडे यांचे निर्देश

व्हाट्सप्प आइकान को दबा कर इस खबर को शेयर जरूर करें 

स्वतंत्र और सच्ची पत्रकारिता के लिए ज़रूरी है कि वो कॉरपोरेट और राजनैतिक नियंत्रण से मुक्त हो। ऐसा तभी संभव है जब जनता आगे आए और सहयोग करे

Donate Now

[responsive-slider id=1466]