DailyNews24Tas

Latest Online Breaking News

बारामतीत कायद्याचं राज्य आहे का? मद्यधुंद तरुणांची गुंडागर्दी; अनेक गाड्या फोडल्या, कोयते दाखवत धिंगाणा, दृश्य सीसीटीव्ही कैद

😊 Please Share This News 😊

बारामतीत कायद्याचं राज्य आहे का? मद्यधुंद तरुणांची गुंडागर्दी; अनेक गाड्या फोडल्या, कोयते दाखवत धिंगाणा, दृश्य सीसीटीव्ही कैद

Baramati Crime News: बारामती म्हटलं की आपल्या डोळ्यासमोर एका विकासित शहराचं चित्र येतं. मात्र इथली कायदा व सुव्यवस्था नेमकी कुठं आहे याचा प्रश्न पडावा असंच सध्या चित्र आहे. बारामतीत मद्यधुंद अवस्थेतील चार ते पाच जणांनी दोन दुचाकीवरुन हातात कोयते घेत आज शहरातील पाचहून अधिक हॉटेलमध्ये धुमाकूळ घातला. अनेक हॉटेलच्या त्यांनी काचा फोडून नुकसान केले असून काही दुचाकींसह चारचाकी वाहनांचं देखील मोठं नुकसान केले आहे. त्यांनी केलेल्या हल्ल्यात दोन जण जखमी झाल्याची माहिती पोलिसांनी दिली. 

बारामतीत कायद्याचं राज्य आहे की नाही असा प्रश्न पडावा अशा या घटनेनंतर शहरात नागरिकांमध्येही भीतीचे वातावरण आहे. संध्याकाळी सातच्या सुमारास एमआयडीसी परिसरातील रेल्वे गेटनजिक या टोळक्यानं एकाचा मोबाईल हिसकावत एका दुकानाची मोडतोड केली.  तिथून पाटस रस्त्यावरील सराफ पेट्रोलपंपावर पेट्रोल टाकून पैसे मागणाऱ्या कर्मचाऱ्यांवर कोयत्याने हल्ला केला, मात्र त्याने तो चुकवल्याने पेट्रोल भरण्यास आलेल्या एका व्यक्तीला कोयता लागल्याची प्राथमिक माहिती आहे. 

त्यानंतर तुळजाराम चतुरचंद महाविद्यालयासमोरील दुकान व हॉटेलमध्ये घुसून भांडणे करीत मोडतोड केली. तिथल्या चार चाकी वाहनांच्या काचा फोडल्या, या शिवाय एकावर हल्ला केल्यानंतर त्याच्या हाताला कोयत्याची दुखापत झाल्याचे प्रत्यक्षदर्शींनी सांगितले. त्यानंतर दुचाकीवरुन हातात कोयते दाखवत गावभर हे युवक फिरत होते. 

काही दुकानांच्या सीसीटीव्हीत ही दृश्य कैद झाली आहेत. या घटनेनंतर पोलिसांनी तत्काळ हालचाल करत दोन युवकांना जेरबंद केले असून त्यांनी कुठे कुठे काय नुकसान केलेले आहे याची माहिती पोलिस घेत आहेत. 

हे युवक मद्यधुंद अवस्थेत दिसत असून गाडीवर कोयते दाखवत शहरभर फिरत होते. तसेच दिसेल त्या गाडीवर काही ठिकाणी त्यांनी कोयत्यांनी वार केले. यामुळं गाड्यांचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालं आहे. या प्रकरणी पोलिस आता तपास करत आहेत. मात्र यानिमित्तानं बारामतीतील कायदा आणि सुव्यवस्थेवर मात्र प्रश्नचिन्ह लागलं आहे. 

राष्ट्रवादीचे अध्यक्ष खासदार शरद पवार, खासदार सुप्रिया सुळे आणि राज्य विधानसभेचे विरोधी पक्षनेते अजित पवार यांच्या कार्यक्षेत्रात अशी घटना घडल्यानं मोठी चर्चा सुरु आहे.

ही बातमी देखील वाचा

व्हाट्सप्प आइकान को दबा कर इस खबर को शेयर जरूर करें 

स्वतंत्र और सच्ची पत्रकारिता के लिए ज़रूरी है कि वो कॉरपोरेट और राजनैतिक नियंत्रण से मुक्त हो। ऐसा तभी संभव है जब जनता आगे आए और सहयोग करे

Donate Now

[responsive-slider id=1466]