DailyNews24Tas

Latest Online Breaking News

महिलांचे मंगळसुत्र हिसकावणारी टोळी जेरबंद, दहा गुन्ह्यांची उकल

😊 Please Share This News 😊

महिलांच्या गळ्यातील मंगळसुत्र (Pune Crime) हिसकावणाऱ्या आरोपींना पोलिसांनी अटक केली असूनत्यांच्याकडून चोरीचे दहा गुन्हे पोलिसांनी उघडकीस आणले आहेत. ही कारवाई सिंहगड रोड पोलीसांनी केली आहे.

ज्ञानेश्वर उर्फ मऊली बिकाजी चव्हाण (वय 20 .देवाची उरळी) व राज महादेव डेंगळे (वय 19 रा. कोंढवा) अशी अटक आरोपींची नावे आहेत.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, धायरी येथील बस स्टॉपवरून 3 जानेवारी रोजी महिलांचे मंगळसुत्र हिसकावून दोन चोरटे चोरून पसार झाले होते. या गुन्ह्याचा तपास करत असताना पोलीस अमंलदार राहूल ओलेकर व शिवाजी क्षिरसागर, अमोल पाटील यांना बातमीदाराकडून बातमी मिळाली की, संबंधीत संशयीत चोरटे हे सिंहगड रोडवर आहेत त्यानुसार पोलिसांनी सापळा रचून आरोपीना ताब्यात घेतले.

सुरुवातीला आरोपींनी उडवा-उडवीची उत्तरे दिली मात्र पोलीस तपासात त्यांनी चोरी केल्याचे कबुल केले. त्यांच्यावरील सिंहगड रोड पोलीस ठाणे येथील पाच, (Pune Crime) भारती विद्यापीठ पोलीस ठाणे येथील दोन, समर्थ पोलीस ठाणे, हडपसर पोलीस ठाणे, कोंढवा पोलीस ठाणे येथील प्रत्येकीएक असे दहा गुन्हे पोलीस तपासात उघड झाले आहेत.

आरोपींवर सिंहगड रोड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल कऱण्यात आला असून सहायक पोलीस निरीक्षक सचिन निकम करत आहेत.

व्हाट्सप्प आइकान को दबा कर इस खबर को शेयर जरूर करें 

स्वतंत्र और सच्ची पत्रकारिता के लिए ज़रूरी है कि वो कॉरपोरेट और राजनैतिक नियंत्रण से मुक्त हो। ऐसा तभी संभव है जब जनता आगे आए और सहयोग करे

Donate Now

[responsive-slider id=1466]