DailyNews24Tas

Latest Online Breaking News

PFI Controversy: ‘पाकिस्तान जिंदाबाद’ घोषणा दिलेल्या व्हिडिओचा फॉरेन्सिक तपास होणार; पुणे पोलिसांची माहिती

😊 Please Share This News 😊

PFI Controversy: ‘पाकिस्तान जिंदाबाद’ घोषणा दिलेल्या व्हिडिओचा फॉरेन्सिक तपास होणार; पुणे पोलिसांची माहिती

PFI Controversy:  पीएफआय कार्यकर्त्यांनी आंदोलनात पाकिस्तान झिंदाबादची घोषणा दिल्याचा दावा सोशल मीडियावर करण्यात येत आहे. यामुद्दावर राजकारण तापू लागले असताना पुणे पोलिसांनी महत्त्वाची माहिती दिली आहे. पीएफआय कार्यकर्त्यांच्या आंदोलनाच्या त्या व्हिडिओची फॉरेन्सिक तपास होणार असल्याचे पुणे पोलिसांनी म्हटले आहे. 

पुणे पोलीस उपायुक्त सागर पाटील यांनी म्हटले की, सोशल मीडियामधून जे व्हिडिओ उपलब्ध आहेत ते एकत्र करणार आहोत. या सगळ्या व्हिडिओचा फॉरेन्सिक तपास करणार आहोत. बंडगार्डन पोलिस ठाण्याच्या हद्दीत जी घटना घडली त्याबद्दल पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यामध्ये  रस्ता अडवणे, बेकायदेशीरपणे जमाव जमवणे, हिंसाचाराचा प्रयत्न आदींबाबत गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. मात्र, सोशल मीडियावर व्हायरल होत असलेल्या व्हिडिओचा तपास करण्यात येणार आहे. त्या अनुषंगाने या गुन्ह्याचा तपास करण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले. 

या तपासात ज्या गोष्टी निष्पन्न होतील, त्यानुसार आणखी काही कलमांतर्गत गुन्हा दाखल होणार असल्याचेही पाटील यांनी स्पष्ट केले. पोलिसांकडून याबाबत कठोर भूमिका घेतली जाणार  असून दोषींवर कारवाई करणार असल्याचे त्यांनी म्हटले. 

प्रकरण काय?

दहशतवाद्यांना आर्थिक मदत आणि दहशतवादी हल्ल्याचा कट रचल्याप्रकरणी देशभरात राष्ट्रीय तपास यंत्रणेने देशभरात छापेमारी केली. महाराष्ट्रातही एनआयए आणि महाराष्ट्र एटीएसने ही कारवाई करत पीएफआयच्या पदाधिकाऱ्यांना अटक केली. पुण्यात या कारवाईच्या निषेधार्थ पीएफआयच्या कार्यकर्त्यांनी आंदोलन केले. पुणे जिल्ह्यात पीएफआयचे मुख्य कार्यालय आहे. 

तपास यंत्रणांनी केलेल्या कारवाईविरोधात पीएफआयच्या कार्यकर्त्यांनी आंदोलन केले. या आंदोलनासाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर निदर्शने करण्याची परवानगी त्यांनी पोलिसांकडे मागितली होती. मात्र, पोलिसांनी ही परवानगी नाकारली. त्यानंतरही आंदोलन करण्यात आले. त्यावेळी पोलिसांनी आंदोलकांना ताब्यात घेतले.

आंदोलकांना ताब्यात घेतले जात असताना पीएफआय कार्यकर्त्यांनी घोषणाबाजी केली. यावेळी पाकिस्तान जिंदाबादची घोषणा देण्यात आली असल्याचा दावा करण्यात आला. याचा दावा करणारा व्हिडिओ व्हायरल करण्यात आला. 

पोलिसांच्या एफआयआरमध्ये काय?

पोलिसांनी दाखल केलेल्या एफआयआरमध्ये पीएफआय कार्यकर्त्यांनी केलेल्या घोषणा नमूद करण्यात आल्या आहेत. यामध्ये भाजप मुर्दाबाद, एनआयए मुर्दाबाद, मासूमो को रिहा करो, अशा घोषणांचा समावेश आहे. मात्र, पाकिस्तान जिंदाबादची घोषणा पोलिसांनी नमूद केली नाही. 

इतर महत्त्वाच्या बातम्या:

व्हाट्सप्प आइकान को दबा कर इस खबर को शेयर जरूर करें 

स्वतंत्र और सच्ची पत्रकारिता के लिए ज़रूरी है कि वो कॉरपोरेट और राजनैतिक नियंत्रण से मुक्त हो। ऐसा तभी संभव है जब जनता आगे आए और सहयोग करे

Donate Now

[responsive-slider id=1466]