DailyNews24Tas

Latest Online Breaking News

संजय राऊतांनंतर किशोरी पेडणेकरांच्या अडचणी वाढल्या, मुंबई पोलिसांनी केली चौकशी

😊 Please Share This News 😊

Kishori Pednekar :  शिवसेना खासदार संजय राऊत यांच्यानंतर मुंबईच्या माजी महापौर किशोरी पेडणेकर अडचणीत सापडल्या आहेत. शुक्रवारी दादर पोलीस स्थानकात किशोरी पेडणेकर यांची 15 मिनिटं चौकशी झाली आहे. शनिवारी पुन्हा त्यांना चौकशीसाठी बोलवण्यात आलं आहे. एसआरएमध्ये फ्लॅट देण्याच्या नावाखाली झालेल्या फसवणुकीत जून महिन्यात दादार पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल झाला होता. यामध्ये किशोरी पेडणेकर यांचे नाव नव्हते. मात्र, या प्रकरणी काही लोकांची चौकशी केली असता दोन किशोरी पेडणेकर यांचं नाव समोर आलं होतं. याचप्रकरणी आज त्यांना चौकशीसाठी बोलवण्यात आलं होतं. आज त्यांची 15 मिनिटं चौकशी झाली असून शनिवारी त्यांना पुन्हा एकदा चौकशीसाठी उपस्थित राहण्यास सांगितलं आहे. 

एसआरएमध्ये फ्लॅट देण्याच्या नावाखाली नऊ जणांची फसवणूक झाल्याचा प्रकार समोर आला होता. याप्रकरणी दादर पोलीस स्टेशनमध्ये जून 2022 मध्ये गुन्हा दाखल झाला होता. यामध्ये किशोरी पेडणेकर यांचं त्यावेळी नाव नव्हतं. मात्र, पोलिसांनी याप्रकरणी चार लोकांना अटक केली होती. त्यांची चौकशी करण्यात आली. यामधील एक व्यक्ती किशोरी पेडणेकर यांचा विश्वासू आहे तर दुसरा मुंबई महापालिकेचा कर्मचारी आहे. या दोन्ही व्यक्तींनी पोलीस चौकशीमध्ये माजी महापौर किशोरी पेडणेकर यांचं नाव घेतल्याची चर्चा आहे. याप्रकरणीच किशोरी पेडणेकर यांना चौकशीसाठी आज बोलवण्यात आलं होतं. उद्या 11 वाजता दादर पोलिसांनी चौकशी साठी बोलावण्यात आल्याची माहिती आहे. पोलिसांना आता नेमके काय पुरावे बेतले आहेत, ज्याचं आधारावर त्यांना चौकशीसाठी बोलावलं आहे.

जूनमध्ये एकूण 9 लोकांची तक्रार होती की एसआरएमध्ये फ्लॅट देण्याच्या नावाखाली त्यांच्याकडून पैसे घेतले गेले होते. मात्र त्यांना  फ्लॅट मिळाले नाहीत. यात ज्या दोन लोकांनी माजी महापौर यांचं नाव घेतलं होता त्यांनी दावा केला आहे की 9 लोकांकडून जे पैसे घेतले गेले त्यातून काही किशोरी पेडणेकर यांना देण्यात आले आहेत. त्याच अनुशंगाने आज पहिल्यांदा या प्रकरणात किशोरी पेडणेकर यांच्या कडून चौकशी करण्यात आली आहे. उद्या पुन्हा त्यांना बोलविण्यात आलं आहे . दरम्यान, या संदर्भात किशोरी पेडणेकर यांच्यातर्फे कायदेशीर सल्ला घेण्यात येत आहे.

व्हाट्सप्प आइकान को दबा कर इस खबर को शेयर जरूर करें 

स्वतंत्र और सच्ची पत्रकारिता के लिए ज़रूरी है कि वो कॉरपोरेट और राजनैतिक नियंत्रण से मुक्त हो। ऐसा तभी संभव है जब जनता आगे आए और सहयोग करे

Donate Now

[responsive-slider id=1466]