DailyNews24Tas

Latest Online Breaking News

अरविंद केजरीवाल यांच्या विरोधात पुण्यात तक्रार, धार्मिक भावना दुखावल्याचा आरोप

अरविंद-केजरीवाल-यांच्या-विरोधात-पुण्यात-तक्रार,-धार्मिक-भावना-दुखावल्याचा-आरोप
😊 Please Share This News 😊

अरविंद केजरीवाल यांच्या विरोधात पुण्यात तक्रार, धार्मिक भावना दुखावल्याचा आरोप

Arvind kejriwal Delhi CM : दिल्लीचे मुख्यमंत्री तसेच आम आदमी पार्टीचे अध्यक्ष अरविंद केजरीवाल यांच्या विरोधात पुण्यात तक्रार दाखल करण्यात आली आहे. धार्मिक भावना भडकविल्याबद्दल केजरीवाल यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यासाठी मागणी करण्यात आली आहे. याप्रकरणी कोंढवा पोलिस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली आहे. 

‘भारतीय चलनावर गणपती, लक्ष्मीचे फोटो   छापा म्हणजे भारताची अर्थव्यवस्था उंचावेल ‘,असे अंधश्रध्दा पसरविणारे वक्तव्य करून अंधश्रध्देला चालना देण्याचे घाट घातल्याकारणाने  केजरीवाल यांच्यावर  गुन्हा दाखल करण्याचे निवेदन इनक्रेडिबल समाजसेवक ग्रुपच्या वतीने कोंढवा पोलिसांना देण्यात आले आहे. पोलिसांनी तक्रार दाखल करुन घेतली आहे. राज्या -राज्यात धार्मिक भा्वना भडकावण्याचा प्रयत्न केल्याबाबत  संपूर्ण देशाची माफी मागावी अशी देखील मागणी करण्यात आली आहे. कोंढवा पोलिसांकडून अद्याप याबाबत कोणताही माहिती देण्यात आलेली नाही. 

अरविंद केजरीवाल काय म्हणाले होते?
गुजरात आणि हिमाचल प्रदेश विधानसभा निवडणुकीला वेग आला आहे. दोन्ही राज्यामध्ये प्रचारानं वेग घेतला आहे. हिमाचल प्रदेशमध्ये 12 नोव्हेंबर रोजी मतदान होणार आहे. तर पुढील आठवड्यात गुजरात विधनसभा निवडणुकीची घोषणा होणार आहे. भाजप, आप आणि काँग्रेस या पक्षानं निवडणुकींची जोरदार तयारी केली आहे. पंतप्रधान मोदी आणि केजरीवाल यांनी गुजरातमध्ये प्रचाराला सुरुवात केली आहे. प्रचारादरम्यान नेत्यांकडून अश्वासनं आणि वक्त्यांचा पाऊस पडत आहे. एकमेकांवर आरोप प्रत्यारोपाच्या फैरी झडत आहे. गुजरात निवडणुकीआधी आम आदमी पक्षाचे नेते अरविंद केजरीवाल यांनी हिंदुत्वाचं कार्ड खेळत नवी मागणी केली. भारतीय चलनी नोटांवर (Currency Note) राष्ट्रपिता महात्मा गांधी (Mahatma Gandhi) यांच्यासोबतच श्रीगणेश (Ganesh) आणि लक्ष्मी (Laxmi) यांच्या प्रतिमा मुद्रित कराव्यात, अशी मागणी केजरीवाल यांनी केली आहे.  अरविंद केजरीवालांच्या वक्तव्यानंतर राजकीय पडसाद उमटू लागलेत. आणि यामुळे राजकारण चांगलंच ढवळून निघालंय. 

आणखी वाचा :

ABP C Voter Survey : नोटांवर लक्ष्मी-गणेश या देवतांचा फोटो लावण्याची केजरीवाल यांची मागणी योग्य की अयोग्य? लोकांनी दिलं हे उत्तर

व्हाट्सप्प आइकान को दबा कर इस खबर को शेयर जरूर करें 

स्वतंत्र और सच्ची पत्रकारिता के लिए ज़रूरी है कि वो कॉरपोरेट और राजनैतिक नियंत्रण से मुक्त हो। ऐसा तभी संभव है जब जनता आगे आए और सहयोग करे

Donate Now

[responsive-slider id=1466]