DailyNews24Tas

Latest Online Breaking News

Mega Block : मुंबईकरांनो आज घराबाहेर पडताय तर ही बातमी नक्की वाचा; मध्य, हार्बर मार्गांवर मेगाब्लॉक

mega-block-:-मुंबईकरांनो-आज-घराबाहेर-पडताय-तर-ही-बातमी-नक्की-वाचा;-मध्य,-हार्बर-मार्गांवर-मेगाब्लॉक
😊 Please Share This News 😊

Mumbai Local Mega Block :  मुंबईकरांसाठी (Mumbai) महत्त्वाची बातमी आहे. रविवारी, 06 नोव्हेंबर रोजी उपनगरीय रेल्वे मार्गांवर मेगाब्लॉक (Mumbai Local Mega Block) घेण्यात आला आहे. त्यामुळे लोकलनं (Mumbai Local) प्रवास करणार असाल तर रेल्वेचं बदललेलं वेळापत्रक जाणूनच प्रवास करा. देखभालीचे काम, रुळांच्या दुरुस्तीच्या कामासाठी आणि सिग्नल यंत्रणेतील कामासाठी हा मेगाब्लॉक घेण्यात येणार आहे. त्याचा मध्य (Central Railway), पश्चिम (Western Railway) आणि हार्बरच्या (Harbour Railway) लोकल वाहतुकीवर परिणाम होणार आहे.  त्यामुळे मुंबईकरांनो रविवारी घराबाहेर पडणार असाल आणि लोकलनं प्रवास करण्याचा विचार करत असाल, तर मेगाब्लॉकबाबत सविस्तर माहिती जाणून घ्या…

रेल्वेच्या मध्य आणि हार्बर मार्गांवर आज रविवारी मेगाब्लॉक (Mega Block) असणार आहे. मध्य रेल्वेकडून याबाबत माहिती देण्यात आली आहे. देखभालीच्या कामांसाठी मेगा ब्लॉक घेण्यात येणार आहे. छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस- विद्याविहार दरम्यान अप आणि धीम्या मार्गावर सकाळी 10.55 ते दुपारी 3. 55 पर्यंत  मेगाब्लॉक असणार आहे. 
 
मध्य रेल्वेने दिलेल्या माहितीनुसार, छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मुंबई येथून सकाळी 10.48 ते दुपारी 3.49 या वेळेत सुटणाऱ्या धीम्या गाड्या छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मुंबई आणि विद्याविहार स्थानकांदरम्यान डाउन जलद मार्गावर वळवण्यात येऊन  भायखळा, परळ, दादर, माटुंगा, शीव आणि कुर्ला स्थानकांवर थांबतील आणि पुढे योग्य डाउन धिम्या मार्गावर वळवण्यात येतील.  तर घाटकोपर येथून सकाळी 10.41 ते दुपारी 3. 50 या वेळेत  सुटणाऱ्या अप धीम्या मार्गावरील गाड्या विद्याविहार ते छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मुंबई दरम्यान अप जलद मार्गावर वळवण्यात येतील आणि या स्थानकांदरम्यान कुर्ला, शीव, माटुंगा, दादर, परळ आणि भायखळा येथे थांबतील.   
 
हार्बर मार्गावर असा असणार मेगाब्लॉक
पनवेल येथून सकाळी 10.33 ते दुपारी 3.49 वाजेपर्यंत  सुटणाऱ्या आणि छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मुंबईकडे जाणाऱ्या अप हार्बर मार्गावरील सेवा आणि छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मुंबई येथून सकाळी 9.45 ते दुपारी 3.12 या वेळेत पनवेल/बेलापूरकडे जाणाऱ्या डाउन हार्बर मार्गावरील सेवा रद्द राहतील. पनवेल येथून सकाळी 11.2 ते दुपारी ते 3.53 वाजेपर्यंत  सुटणाऱ्या आणि ठाण्याकडे जाणाऱ्या अप ट्रान्सहार्बर मार्गावरील सेवा आणि ठाणे येथून सकाळी 10.1 ते दुपारी 3.20 वाजेपर्यंत पनवेलकडे जाणाऱ्या डाउन ट्रान्सहार्बर मार्गावरील सेवा रद्द राहतील.

ब्लॉक कालावधीत बेलापूर/नेरुळ आणि खारकोपर दरम्यानच्या उपनगरीय रेल्वे सेवा वेळापत्रकानुसार धावतील. याबरोबरच  ठाणे-वाशी/नेरुळ स्थानकांदरम्यान ट्रान्सहार्बर लाईन सेवा उपलब्ध असेल. शिवाय  ब्लॉक कालावधीत छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मुंबई- वाशी भागांत विशेष उपनगरीय गाड्या धावतील. 

व्हाट्सप्प आइकान को दबा कर इस खबर को शेयर जरूर करें 

स्वतंत्र और सच्ची पत्रकारिता के लिए ज़रूरी है कि वो कॉरपोरेट और राजनैतिक नियंत्रण से मुक्त हो। ऐसा तभी संभव है जब जनता आगे आए और सहयोग करे

Donate Now

[responsive-slider id=1466]