Pune Metro : पुणे मेट्रो होणार स्मार्ट! पुणेकरांना व्हॉट्सअपवर मिळणार तिकीट
😊 Please Share This News 😊
|
Pune Metro : पुणे मेट्रो होणार स्मार्ट! पुणेकरांना व्हॉट्सअपवर मिळणार तिकीट
Pune Metro : पुणे मेट्रोचं (Pune metro) तिकीट आता व्हॉट्सअपवर (Whatsapp) उपलब्ध होणार आहे. त्यामुळे पुणेकरांना याचा फायदा होणार आहे. पुणे मेट्रोने एक व्हॉट्सअॅप नंबर जारी केला आहे. त्या नंबरवर व्हॉट्सॲप केल्यावर प्रवाशांच्या मोबाईलवरच क्यूआर कोड येणार आहे. या क्यूआर कोडच्या माध्यमातून प्रवाशांना तिकीट मोबाईलवर मिळणार आहे.
9420101990 हा नंबर पुणे मेट्रोकडून प्रवाशांना देण्यात आला आहे. पुणे मेट्रोच्या या सोयीमुळे प्रवाशांना रांगेत तात्काळत उभं राहण्याचा त्रास वाचणार आहे. पुणेकरांचा तिकीटांसाठीचा त्रास कमी होणार आहे. प्रवाशांना दोन पद्धतीने ई-तिकीट काढता येणार आहे. पहिली पद्धत म्हणजे किऑस्क मशिनच्या साहाय्याने प्रवासी स्वतः हे तिकीट काढू शकतो. तर दुसरी पद्धत म्हणजे स्थानकात जाऊन टॉम ऑपरेटरशी संपर्क साधून आपल्याला ई-तिकीट मिळवता येईल.
पर्यावरणपूरक ई-तिकीट
पुणे मेट्रोच्या या निर्णायामुळे पर्यावरण रक्षण देखील होणार आहे. ई-तिकीट पेपरलेस असल्याने पर्यावरणपूरक आहे. त्यामुळे कचरादेखील कमी होणार आहे. यामुळे मोठ्या प्रमाणात कागदाची बचत होणार आहे. मेट्रो स्टेशनला गेल्यावर काउंटरवर स्कॅन करावा लागेल त्यानंतर तुमच्या व्हॉट्सअपवर ओटीपी येईल. तो क्रमांक ऑपरेटरला सांगितल्यावर तुमच्या मोबाईलवर लिंक येईल. त्या लिंकवर क्लिक केल्यास तुमचं ई-तिकीट तुम्हाला मिळाणार आहे.
पुणे मेट्रो विस्तारणार
पीएमआरडीए (PMRDA) आणि ‘महामेट्रो’कडून सुमारे 43 किलोमीटर लांबीच्या मेट्रो मार्गाच्या विस्तारीकरणाचे नियोजन करण्यात आलं आहे. त्यामुळे हिंजवडी ते शिवाजीनगर हा 23 किलोमीटर लांबीच्या मार्गासह एकूण 66 किलोमीटर लांबीचे मेट्रोचे जाळे शहरात निर्माण होणार आहे. त्यामध्ये खडकवासला ते स्वारगेट, हडसपर ते सासवड आणि स्वारगेट ते रेसकोर्स या मार्गांचा समावेश आहे.पिंपरी-चिंचवड ते स्वारगेट या मेट्रो प्रकल्पाचे काम महामेट्रोने हाती घेतले आहे तर हिंजवडी ते शिवाजीनगर या मेट्रो प्रकल्पाचे काम पीएमआरडीएने हाती घेतले आहे. त्यानुसार हिंजवडी ते शिवाजीनगर हा मार्ग लोणीकाळभोरपर्यंत विस्तार करण्याचा निर्णय पीएमआरडीएने घेतला तर खडकवासला ते खराडी हा 28 किलोमीटरचा मार्ग होणार आहे. विस्तारित मेट्रो मार्ग हा शिवाजीनगर, पुलगेट, हडपसर आणि लोणीकाळभोर तर एक फाटा सासवड रोडवर असा आहे. महामेट्रोचा खडकवासला हा मार्ग स्वारगेट, पुलगेट-हडपसर फाटा ते खराडी असा आहे. या विस्तारीकरणामुळे अनेक पुणेकरांना फायदा होणार आहे. पुण्यात वाहतूक कोंडीचा प्रश्न सध्या आ फाडून आहे. त्यामुळे मेट्रो विस्तारीकरणामुळे वाहतूक कोंडी कमी होईल, अशी पुणेकरांची अपेक्षा आहे.

व्हाट्सप्प आइकान को दबा कर इस खबर को शेयर जरूर करें |