DailyNews24Tas

Latest Online Breaking News

Ramdas Athawale: चंद्रकांत पाटलांच्या वक्तव्यावर रामदास आठवले यांची प्रतिक्रिया; म्हणाले, चंद्रकांत पाटलांना…. 

😊 Please Share This News 😊

कल्याण: भाजपचे मंत्री चंद्रकांत पाटील (Chandrakant Patil) नेमके काय म्हणाले माहिती नाही, पण लोकांनी शाळा चालवण्यासाठी सरकारवर अवलंबून न राहता स्वत:च्या हिमतीवर शाळा सुरू करव्यात असं त्यांना म्हणायचं असेल असं केंद्रीय मंत्री रामदास आठवले (Ramdas Athawale) म्हणाले. चंद्रकांत पाटील यांनी केलेल्या वक्तव्यावर रामदास आठवले यांनी त्यांची बाजू सावरून घेतली. केंद्रीय मंत्री रामदास आठवले आज कल्याणमधील आचार्य अत्रे नाट्यगृहात आयोजित आरपीआयच्या एका कार्यक्रमाच्या निमित्ताने आले होते.

भाजप नेते चंद्रकांत पाटील यांनी पैठण संत पेटीतील एक कार्यक्रमात एक वक्तव्य केलं होतं. शाळा चालवण्यासाठी सरकारवर अवलंबून का राहता, भाऊराव पाटील, महात्मा फुले आणि  बाबासाहेब आंबेडकर यांनी शाळा चालवण्यासाठी भीक मागितली असं वक्तव्य केलं होतं. याबाबत  केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांना विचारलं असता ते म्हणाले की, चंद्रकांत पाटील यांनी काय वक्तव्य केलं ते माहित नाही. मात्र ही गोष्ट खरी आहे की बाबासाहेब आंबेडकर, महात्मा ज्योतिबा फुले यांनी डोनेशन न घेता, स्वतःच्या पैशातून शाळा सुरू केल्या होत्या. कदाचित त्यांना असं म्हणायचं असेल की लोकांनी स्वतःच्या बळावर शाळा सुरू केल्या पाहिजेत. 

भीक मागण्याचा विषय नाही, मात्र अनेक लोकांच्या मदतीवर डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी पीपल्स रीपब्लिकन सोसायटी सुरू केली असं सांगत रामदास आठवले म्हणाले की, बाबासाहेब आंबेडकरांनी शिक्षणाला फार महत्त्व दिलं होतं. 

शिवाजी महाराज आदर्श, त्यांच्याबद्दल वक्तव्य करणं चुकीचं 

राज्यपालांनी शिवाजी महाराजांच्यावर केलेल्या वक्तव्यावर बोलताना रामदास आठवले म्हणाले की, “शिवाजी महाराजांबद्दल उलटे सुलटे वक्तव्य कुणाकडून होता काम नये. छत्रपती शिवाजी महाराज याआधी देखील आदर्श होते आजच्या आणि उद्याच्या पीढीचे देखील आदर्श आहेत. छत्रपती शिवाजी महाराजांच्या नावाने समाजकारण-राजकारण करणारे सर्व पक्ष आहेत. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या नावाने आपली भूमिका मांडणारे अनेक पक्ष आहेत. त्यामुळे महापुरुषांबद्दल अशा प्रकारची भूमिका घेणे योग्य नाही. त्यांच्याबद्दल अशा पद्धतीचे वक्तव्य कोणी करू नये. राज्यपालांच्या विरोधात असंतोष आहे. त्यांच्याबाबत जो काही निर्णय घ्यायचा तो अधिकार राष्ट्रपतींचा आहे. त्यांनी लवकरात लवकर निर्णय घ्यावा.”

अलीकडच्या काळात महाराष्ट्र सोडून जाण्याच्या मागण्या होऊ लागल्या आहेत, हे महाराष्ट्रासाठी भूषणावह नाही, अशा गावांकडे विशेष लक्ष द्यावं असं केंद्रीय मंत्री रामदास आठवले म्हणाले. तसेच शिवसेना आणि वंचित आघाडी एकत्रित येण्याची चर्चा सुरू असताना या नव्या आघाडीमुळे महायुतीला काहीही फरक पडणार नाही अशी प्रतिक्रिया त्यांनी दिली. 

 

व्हाट्सप्प आइकान को दबा कर इस खबर को शेयर जरूर करें 

स्वतंत्र और सच्ची पत्रकारिता के लिए ज़रूरी है कि वो कॉरपोरेट और राजनैतिक नियंत्रण से मुक्त हो। ऐसा तभी संभव है जब जनता आगे आए और सहयोग करे

Donate Now

[responsive-slider id=1466]