DailyNews24Tas

Latest Online Breaking News

MVA Morcha: महाविकास आघाडीचा मुंबई मोर्चा; शिवसेना, काँग्रेस, राष्ट्रवादीची कशी आहे तयारी?

😊 Please Share This News 😊

MVA morcha in Mumbai: महाराष्ट्रद्रोही विरोधात हल्लाबोल ही लाईन डोळ्यासमोर ठेवून महाविकास आघाडी 17 डिसेंबरला मुंबईत विराट मोर्चा काढणार आहे. यासाठी शिवसेना (ठाकरे गट ) राष्ट्रवादी आणि काँग्रेस हे पक्षांनी कार्यकर्त्यांना जमवण्यासाठी तयारीला सुरुवात केलीय. प्रत्येक पक्षाने एक लाखाचं टार्गेट ठेवून जवळपास तीन लाखांहून अधिक कार्यकर्ते जमवण्याचे टार्गेट ठेवलय. या ऐतिहासीक विराट मोर्चासाठी तीनही पक्षांच्या प्रमुख नेत्यांच्या बैठका सुरू झाल्यात. त्याच सोबत कार्यकर्त्यांना जमवण्यासाठी ही प्लॅनिंग करायला सुरुवात झालीय.

राज्यातील भाजपच्या विरोधामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेना या तीन पक्षांनी मिळूनमहाविकास आघाडी स्थापन केली. मात्र सत्तांतर झाल्यानंतर आता हीच महाविकास आघाडी आक्रमक भूमिका घेत विराट मोर्चाचं आयोजन करत आहे. येत्या 17 डिसेंबरला मुंबईत विराट असा मोर्चा काढण्यासाठी तीनही पक्षांनी चांगलीच कंबर कसलेली पाहायला मिळते. यासाठी तीनही पक्षांच्या प्रमुख नेत्यांच्या बैठकाही पार पडताना पाहायला मिळत आहे. मुंबई महानगरपालिका डोळ्यासमोर ठेवून महाविकास आघाडी मुंबईत मोठ शक्ती प्रदर्शन करू पाहत आहे. महाराष्ट्रद्रोही विरोधात हल्लाबोल या नावाने हे तीनही पक्ष एकत्र येऊन विराट असा मोर्चा काढणार आहे…

भाजपचे नेते आणि राज्यपाल यांच्याकडून छत्रपती शिवाजी महाराज आणि इतर महापुरुषांचा वारंवार झालेला अपमान त्याचप्रमाणे कर्नाटक सीमा वादाचा सुरू असलेला प्रश्न यापार्श्वभूमीवर महाविकास आघाडी आक्रमक झालीये. लाखोच्या संख्येने मुंबईमध्ये ही  मोर्चा काढण्यासाठी तयारी सुरू झालीय. पक्षाने जास्तीत जास्त पदाधिकारी आणि कार्यकर्ते मुंबईतपोहोचण्यासाठी तयारी सुरू केलीय….

कोणत्या पक्षाची काय तयारी?- 

राष्ट्रवादी-

राष्ट्रवादी अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी नागपुरात विराट असा शेतकऱ्यांच्या प्रश्नावर मोर्चाकाढणार होती. मात्र तो मोर्चा रद्द करून आता महाविकास आघाडी एकत्रितपणे मुंबईत विराट मोर्चाकाढणार आहे. एक लाख राष्ट्रवादीचे कार्यकर्ते आणि पदाधिकारी मुंबईत दाखल होतील अशी व्यवस्था करण्यात येत आहेत. मुंबई शहरात जास्तीत जास्त शिवसेनेने कार्यकर्ते जमा करावेत आणि राष्ट्रवादी पश्चिम महाराष्ट्र आणि इतर भागातून कार्यकर्त्यांना बोलवणार आहे. ज्या गावात ग्रामपंचायत निवडणुका नाहीत त्या गावातील राष्ट्रवादीच्या पदाधिकाऱ्यांना मुंबईत आमंत्रित करायला सुरुवात केलीय. त्यासाठी आतापासूनच तालुकाध्यक्ष जिल्हाध्यक्ष आणि इतर पदाधिकाऱ्यांना फोन करून जबाबदारीद्यायला सुरुवात केलीय. 

काँग्रेस – 

काँग्रेसने ही सर्वाधिक कार्यकर्ते जमण्यासाठी प्रयत्न सुरू केले आहेत. त्यासाठी काँग्रेसच्यानेतृत्वाखाली काम करणाऱ्या सर्वच संघटनांना जबाबदारी देण्यात आली. 
मुंबई शहर आणि उपनगरातील जास्तीत जास्त पदाधिकारी बोलवण्यात येणार  आहेत. त्याच सोबतउर्वरित महाराष्ट्रातून सुद्धा पदाधिकारी आणि कार्यकर्ते बोलवण्यास सुरुवात झाली आहे. 

शिवसेना(ठाकरे गट)

शिवसेनेने जास्तीत जास्त कार्यकर्ते मुंबई शहरातून जमा करण्याचं ठरवलेलं आहे. तर मुंबई बाहेरून राष्ट्रवादी आणि काँग्रेसचे कार्यकर्ते जमवणार आहेत. उद्धव ठाकरे या मोर्चात सहभागी होत असल्याने प्रत्येक शाखाप्रमुखपासून ते विभाग प्रमुखापर्यंत जबाबदारी देण्यात आली आहे. शिवसेनेकडून महिला वर्ग जास्त उपस्थित करण्याचा प्रयन्त सुरु आहे. 

महाविकास आघाडी मिळून तीन लाखाहून अधिक कार्यकर्ते जमवण्याचे टार्गेट ठेवण्यातआलेल आहे. राणीच्या बागेपासून १७ डिसेंबरला अकरा वाजता या मोर्चाला सुरुवात होईल. त्यानंतरहा मोर्चा आझाद मैदानाच्या दिशेने येणार आहे. टाइम्स ऑफ इंडियाच्या इमारतीच्या समोर मोठास्टेज टाकून त्याच ठिकाणी मोठी सभा होण्याची शक्यता आहे. सभेला शिवसेनेकडून उद्धव ठाकरे, संजय राऊत आणि इतर वरिष्ठ नेते उपस्थित राहणार आहेत. काँग्रेसकडून नाना पटोले, बाळासाहेब थोरात, अशोक चव्हाण, भाई जगताप आणि इतर नेते उपस्थित असतील. तर राष्ट्रवादीकडून अजितपवार,सुप्रिया सुळे, जयंत पाटील आणि शरद पवार सुद्धा येण्याची शक्यता आहे. डावे पक्ष सुद्धा यामोर्चात सहभागी होणार आहेत. राज्यात सत्तांतर झाल्यानंतर महाविकास आघाडी एकत्रीतपणे मोर्चा काढणार होती. मात्र ते अनेकदा यशस्वी होऊ शकलं नाही. हिवाळी अधिवेशनाच्या तोंडावरमहाविकास आघाडी हा विराट मोर्चा काढणार आहे. मुंबई महापालिका डोळ्यासमोर ठेवून महाविकासआघाडीच हे मोठ शक्ती प्रदर्शन आसणार आहे. त्यामुळे येत्या 17 डिसेंबरच्या मोर्चाला पोलिस परवानगी देणार का? त्याचसोबत कोणता पक्ष किती शक्ती प्रदर्शन करणार हे ही पहाण महत्वाचं राहणार आहे…

व्हाट्सप्प आइकान को दबा कर इस खबर को शेयर जरूर करें 

स्वतंत्र और सच्ची पत्रकारिता के लिए ज़रूरी है कि वो कॉरपोरेट और राजनैतिक नियंत्रण से मुक्त हो। ऐसा तभी संभव है जब जनता आगे आए और सहयोग करे

Donate Now

[responsive-slider id=1466]