काय भिकारड्यासारखं बोलतो, असं म्हटलं तर कसं वाटेल? अजित पवारांचा चंद्रकांत पाटलांवर हल्लाबोल
😊 Please Share This News 😊
|
काय भिकारड्यासारखं बोलतो, असं म्हटलं तर कसं वाटेल? अजित पवारांचा चंद्रकांत पाटलांवर हल्लाबोल
Ajit Pawar On Chandrakant Patil: कर्मवीर भाऊराव पाटील, महात्मा फुले, डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्याबाबत चंद्रकांत पाटील यांनी केलेल्या वक्तव्यानंतर वादंग निर्माण झालेय. विरोधकांनी चंद्रकांत पाटील यांच्यावर टीकास्त्र सोडलेय, राज्यात अनेक ठिकाणी आंदोलनं झाली. विरोधीपक्ष नेते अजित पवार यांनी चंद्रकांत पाटील यांच्या या वक्तव्याचा आपल्या शैलीत समाचार घेतला आहे. अजित पवार म्हणाले की, ‘आपले पालकमंत्री चंद्रकांत पाटील काय म्हणाले. महापुरुषांचा सारखं आपमान करतात. आम्ही महापुरुषांचा अपमान सहन करणार नाही. भीक मागून शाळा बांधल्या असं सांगितले. कुणी सांगितले यांना भीक मागून केलं म्हणून? आम्ही म्हणालो काय भिकारड्यासारखं बोलतो तर काय वाटेल तुम्हाला? आम्ही तसं बोलणार नाही. आरे ला कारे आम्हाला खूप चांगलं करता येतं. पण आम्ही ते करणार नाही. आमची ती संस्कृती नाही. यांना आता त्यांची जागा दाखवण्याची वेळ आली आहे. कोण भिकेला लागतंय हे दाखवायची वेळ आली आहे.’ इंदापूर येथील कृषी मोहोत्सव कार्यक्रमात अजित पवार बोलत होते.
यांचे मंत्री वाचळवीरसारखे वक्तव्य करतात. इतिहास बदलण्याचा प्रयत्न करत आहात का? महिलांचा अपमान का करता? बदनाम का करता? महिलांचे चरित्र हणणं का करता? एकजण तर म्हणाला शिवाजी महाराज आग्र्यातून जसे सुटले तसे एकनाथ शिंदे तावडीतून सुटले.. कुणाच्या तावडीतून सुटले? सुरत, गुहाटी रेडा कापला. कोणताही विकासाचा प्रकल्प महाविकास आघाडी सरकारने थांबवला नाही.. परंतु यांनी थांबवले, असा हल्लाबोल अजित पवार यांनी केला.
यावेळी बोलताना अजित पवार म्हणाले की, एकजण तर म्हणाला अफजलखानानाने शिवाजी महाराजांचा कोथळा बाहेर काढला? आपण काय बोलतो? दिवसा चंद्रावर जातात का काय माहिती. आम्ही ओला दुष्काळ जाहीर करा अशी मागणी करत होतो. उसाचे टनेज घटले आहे. यांनी साखरेच्या बाबतीत कोटा पद्धत काढली. लोकांची कनेक्शन का कट करता? देवेंद्र फडणवीस म्हणतात की कनेक्शन कट करणार नाही. पण हे करतात ना? यांनाच कट करायची वेळ आली आहे. बोम्बाई म्हणतात हवं माझं ते माझं. महाराष्ट्र काय आंदण दिला का? ते म्हणतात ते हे माझं ते माझं. आपले मुख्यमंत्री का म्हणत नाहीत, हे माझं म्हणून? लोकांच्या मनात फुटून जाण्याची भावना आली याला जबाबदार कोण?
कर्नाटकला आपले 2 मंत्री जाणार होते. परत तेच म्हणाले महापरिनिर्वाण दिन आहे. काही उचित प्रकार घडायला नको.. आधी कळलं नाही का महापरिनिर्वाण दिन आहे म्हणून. उगाच काहीतरी थापा मारता, असा टोला अजित पवार यांनी लगावला. आपले अनेक प्रकल्प दुसरीकडे गेले. देशात बेरोजगारीचा दर 8.3 टक्क्यांवर गेला आहे.. सगळं खापर मागच्या सरकारवर फोडतात. सहा महिने झालं मंत्री होऊन तरी काय झालं तरी ते म्हणतात मागच्या सरकारने केलं. काम करायचे सोडून जोतिष्याला हात दाखवून येतात..आधी नवस करायला जातात आणि परत नवस फेडायला जातात. रेडा कापायला जातात, असा टोलाही यावेळी अजित पवार यांनी लगावला.

व्हाट्सप्प आइकान को दबा कर इस खबर को शेयर जरूर करें |