शाईफेक झाली तर डोळा वाचायला हवा म्हणून फेस शिल्ड घातलं : चंद्रकांत पाटील
😊 Please Share This News 😊
|
शाईफेक झाली तर डोळा वाचायला हवा म्हणून फेस शिल्ड घातलं : चंद्रकांत पाटील
Chandrakant Patil News: पुन्हा एकदा शाईफेकीची धमकी आल्याने पुण्याचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील (Chandrakant Patil In Pune) थेट फेस शिल्ड घालून पिंपरी चिंचवडमध्ये पोहोचले. महापालिकेने (Pimpari chinchwad Mahapalika) भरवलेल्या पवना थडी जत्रेला (Pavna Thadi Yatra) त्यांनी भेट दिली आणि स्टॉलवर फेस शिल्ड घालूनच खरेदीचा आनंद लुटला. फेस शिल्ड घालण्यासंदर्भात त्यांना विचारलं असता ते म्हणाले की, माझ्यावर कोणी शाई फेक केली तर माझा डोळा वाचायला हवा. म्हणून मी हे फेस शिल्ड घातलं. चंद्रकांत पाटील म्हणाले की, 2007 साली माझ्या डाव्या डोळ्यात कॅन्सर निष्पन्न झाला होता, त्यावेळी यशस्वी शस्त्रक्रिया पार पडली. तेव्हापासून डॉक्टरांनी मला डोळ्यांची काळजी घेण्याची ताकीद दिलेली आहे, असं ते म्हणाले.
चंद्रकात पाटील पुढे म्हणाले की, आता माझे कार्यकर्ते अथवा पोलीस कोणीही इथं झोपा काढत नाहीत. पण त्यातूनही कोणी माझ्यावर शाई फेक केली तर माझा डोळा वाचायला हवा. म्हणून मी फेस शिल्ड घातलेलं आहे, असं चंद्रकात पाटलांनी यावेळी फेस शिल्ड घालण्यामागचं कारण सांगितलं. मी फेस शिल्ड लावून फिरतोय म्हणून पत्रकार बातमीही करतील असं ही नमूद करायला पाटील विसरले नाहीत.
नेमकं झालेलं काय
शाईफेक प्रकरणानंतर पुण्याचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी आता सावध भूमिका घेतली. आजच त्यांना पुन्हा शाईफेकीची धमकी आल्यानं सार्वजनिक कार्यक्रमात सहभागी होताना फेस शिल्डचा वापर केला. फेस शिल्ड लावत ते पवनाथडी जत्रेच्या उद्घाटनाला हजर झाले. खबरदारी म्हणून त्यांनी फेस शिल्डचा वापर केला. त्यांच्या या फेस शिल्डची सध्या चांगलीच चर्चा रंगली आहे.
सकाळीच त्यांना सोशल मीडियावर शाईफेकीची धमकी आली होती. दोन व्यक्तींनी फेसबुक पोस्ट करत ही धमकी दिली होती. त्यांच्यावर सांघवी पोलीस ठाण्यात गुन्हादेखील दाखल करण्यात आला होता. मात्र दोघांनाही पोलिसांनी ताब्यात घेतलं नसल्याने शाईफेक होण्याची शक्यता होती. यामुळे चंद्रकांत पाटलांनी खबरदारी म्हणून फेस शिल्ड लावत उद्घाटन केलं.
पवना थडी जत्रेचं उद्घाटनाच्या वेळी पोलिसांचा मोठा बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. सांघवीच्या साई चौकापासून तर कृष्णा चौकापर्यंत पोलिसांच्या ताफा तैनात करण्यात आला होता. यावेळी कोणताही अनुचित प्रकार घडू नये, यासाठी कडक बंदोबस्त तैनात ठेवला आहे. शिवाय मागील काही दिवसांपासून चंद्रकांत पाटलांच्या सुरक्षेतदेखील वाढ करण्यात आली आहे.
ही बातमी देखील वाचा

व्हाट्सप्प आइकान को दबा कर इस खबर को शेयर जरूर करें |