Pune News : पुण्यातील तरुणाचा नाविन्यपूर्ण उपक्रम; कापडी पिशव्यांच्या वापरासाठी अनोखी संकल्पना
😊 Please Share This News 😊
|
Pune News : पुण्यातील तरुणाचा नाविन्यपूर्ण उपक्रम; कापडी पिशव्यांच्या वापरासाठी अनोखी संकल्पना
Pune News : सध्याच्या काळात प्लास्टिकचा अधिकाधिक वापर केला जातोय. यामुळे आपल्या आजूबाजूच्या परिसरात फक्त प्रदूषण वाढते आणि याचा आरोग्यावर परिणाम होतो. यासाठी सरकारकडूनदेखील प्लास्टिकबंदी संबंधित अनेक प्रयत्न राबवले जातात. याच गोष्टीकडे गांभीर्याने लक्ष देऊन पुण्याच्या स्वप्निल जोशी (Swapnil Joshi) या तरुणाने एक नवीन उपक्रम राबविला आहे. स्वप्नील जुन्या कपड्यांचा वापर करून नवनवीन आकर्षक वस्तू तयार करण्याचे नाविन्यपूर्ण काम करत आहेत. त्याच्या या उपक्रमाला भरघोस प्रतिसादही मिळतोय.
‘इको रिगेन’(Eco Regain) हे स्वप्नीलच्या कंपनीचे नाव आहे. स्वप्निलने कचरा व्यवस्थापनाचा अभ्यास केला आहे. या दरम्यान त्याच्या लक्षात आले की, प्लास्टिक आणि इलेक्ट्रॉनिक कचरा यासंबंधी बऱ्याच योजना उपलब्ध आहेत. पण, या वस्तू वापरून फेकून दिलेल्या कचऱ्याच्या व्यवस्थापनाचा विचार केला जात नाही.
जुन्या कपड्यांपासून नाविण्यपूर्ण वस्तू
पुण्यातील सदाशिव पेठेत ‘इको रिगेन’चे दुकान असून, त्यांच्या कामाचे स्वरुप अगदी सोपे आहे. तिथे आठ रुपये प्रति किलोने जुने कपडे देता येतात. दिलेल्या कपड्यांच्या मोबदल्यात त्यांच्या दुकानातून खरेदी करताना वस्तूंवर मूळ किंमतीच्या आठपट सवलत मिळते. जुन्या कपड्यांपासून तयार केलेल्या हँडबॅग, कॅरीबॅग, डोअरमॅट, वॉलेट, सतरंजी, कारपेट, चादर यांसारख्या अनेक वस्तू त्यांच्या दुकानात मिळतात. स्वप्नील आणि त्याच्याबरोबर असलेल्या सभासदांनी राबविलेला हा उपक्रम गेली दोन वर्ष सुरु आहे. पण, आता आलेल्या प्लास्टिकबंदीमुळे त्यांच्याकडे कापडी पिशव्यांना विशेष मागणी आहे.
या बरोबरच तो न वापरलेले कपडे सामाजिक संस्थांनाही दान करतो. तसेच, आकर्षक वस्तूंच्या उत्पादनासाठी त्याने विविध सामाजिक संस्थांशी हातमिळवणी केली आहे. यातून महिलांना रोजगार मिळून त्यांचे सक्षमीकरण करण्यासही मदत होते.
महत्त्वाच्या बातम्या :

व्हाट्सप्प आइकान को दबा कर इस खबर को शेयर जरूर करें |