रश्मी शुक्लांच्या अडचणीत वाढ, फोन टॅपिंगप्रकरणी चौकशीचे पुणे सत्र न्यायालयाचे आदेश
😊 Please Share This News 😊
|
रश्मी शुक्लांच्या अडचणीत वाढ, फोन टॅपिंगप्रकरणी चौकशीचे पुणे सत्र न्यायालयाचे आदेश
Rashmi Shukla Phone Tapping Case : पुण्याच्या माजी पोलीस आयुक्त आणि सध्याच्या सीआरपीएफच्या पोलीस महासंचालक रश्मी शुक्ला यांच्या अडचणीत वाढ झाली आहे. फोन टॅपिंग प्रकरणाची पुन्हा नव्याने चौकशी करण्याचे आदेश पुणे सत्र न्यायालयाने दिले आहेत. पुणे पोलिसांनी क्लोजर रिपोर्ट सादर करताना न्यायालयात जमा केलेली कागदपत्रं पुन्हा तपास अधिकाऱ्याकडे सोपवण्याचे आदेशही न्यायालयाने दिले आहेत. मार्च 2016 ते जुलै 2018 दरम्यान फोन टॅपिंग करण्यात आले होते, असा रश्मी शुक्ला यांच्यावर आरोप आहे.
रश्मी शुक्ला यांनी आम्हाला फोन टॅपिंग करायला लावल्याचा धक्कादाय खुलासा तत्कालीन पोलीस उपायुक्त पंकज डहाणे यांनी चौकशी वेळी दिलाय. मार्च 2016 ते जुलै 2018 दरम्यान फोन टॅपिंग करण्यात आले होते. 2021 मध्ये सभागृहात नाना पटोले यांनी माजी फोन देवेंद्र फडणवीस यांच्या सांगण्यावरून रश्मी शुक्ला यांनी केल्याचा आरोप केला होता. या फोन टॅपिंग प्रकरणात भाजपाचे काही बडे नेते, राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष सहित काँग्रेसचे नाना पटोले यांचा देखील समावेश होता, असे सांगितलं होतं.
फोन टॅपिंग झालेले नावे : नाना पटोले, रावसाहेब दानवे यांचे स्वीय सहाय्यक, भाजपाचे खासदार संजय काकडे, प्रहार संघटनेचे अध्यक्ष आणि आमदार बच्चू कडू, आशिष देशमुख काही सरकारी अधिकारी आणि काही पत्रकारांचा यामध्ये समावेश होता.
याप्रकरणी त्यावेळी तत्कालीन गृहमंत्री दिलीप कोळसे पाटील यांनी एक तीन सदस्य समिती गठीत केली होती. त्यावेळी तत्कालीन पोलीस महासंचालक संजय पांडे हे चौकशी समितीचे प्रमुख होते. राज्य गुप्तचर विभागाचे प्रमुख आणि हे या समितीचे सदस्य होते. या समितीने चौकशी केल्यानंतर पुण्याच्या पोलीस निरीक्षक वैशाली चांदगुडे यांनी 25 फेब्रुवारी 2022 मध्ये पुण्यातील बंड गार्डन पोलिसात तक्रार दाखल केली होती. राज्यातील बड्या नेत्यांचे बेकायदेशीर टॅपिंग केल्याचा ठपका या तीन सदस्य समितीने शुक्ला यांच्यावर ठेवण्यात आला होता. समितीने राज्य सरकारला सादर केलेल्या अहवालात पुणे पोलीस आयुक्त पदावर असताना रश्मी शुक्ला यांनी बेकायदेशीर फोन टॅपिंग केल्याचे नमूद केले. या सर्वांचे दोन महिन्याचे कॉल डिटेल्स रेकॉर्ड तयार करून एक सीडी बनवण्यात आली होती.
नाना पटोले यांचे फोन अमजद खान या नावाने टॅपिंग करत होते. बच्चू कडू यांचा फोन नंबर निजामुद्दीन बाबू शेख या नावाने खून सर्वलेन्स वर लावण्यात आला होता. आशिष देशमुख यांचा फोन नंबर रघु चोरगे आणि हिना साळुंखे या नावाने लावण्यात आला होता.
परंतु जुलै 2022 मध्ये झालेल्या सत्तांतरानंतर पुणे पोलिसांनी रश्मी शुक्ला यांना या सर्व फोन टॅपिंग प्रकरणात क्लीन चीट देत पुणे न्यायालयात क्लोजर रिपोर्ट सादर केला होता. बंडगार्डन पोलिसात दाखल झालेली एफ आय आर चुकीच्या तथ्यात दाखल करण्यात आली होती, असे नमूद करत त्यांना क्लीन चिट मिळावी असे क्लोजर रिपोर्ट न्यायालयाकडे सादर केला होता. परंतु न्यायालयाने हा क्लोजर रिपोर्ट फेटाळून लावत रश्मी शुक्ला यांना क्लीन चीट देण्यास मनाई केली. या क्लोजर रिपोर्ट मधील गोपनीय माहिती हाती लागली असून या रिपोर्टमध्ये रश्मी शुक्ला यांनी त्यांचे पोलीस अधिकारी असलेले सहकारी पोलीस उपायुक्त पंकज डहाणे आणि पोलीस कर्मचारी शाकूर सय्यद यांच्यावर बेकायदेशीरपणे ड्रग पेडलर असल्याचा संशय व्यक्त करून करायला लावले होते. काही फोन नंबर ट्रॅप करायला लावले होते. रश्मी शुक्ला यांनी टॅपिंग करण्यात आलेल्या सर्व नंबरचा वापर कुठेही याबाबतची माहिती लिंक करण्यात आली नाही. त्याचा गैरवापर सुद्धा करण्यात आला नाही, त्यामुळे रश्मी शुक्ला यांना या प्रकरणात क्लीन चीट मिळावा, अशा स्वरूपाची मागणी पुढे पोलिसांनी न्यायालयापुढे केली होती. परंतु न्यायालयाने ही मागणी फेटाळून लावत रश्मी शुक्ला यांना क्लीन चीट देण्यास नकार दिला. .
रश्मी शुक्लांशी संबंधित फोन टॅपिंग प्रकरणात राज्यात सत्ताबदल झाल्यावर पुणे पोलीसांनी अचानक घुमजाव करत क्लोजर रिपोर्ट सादर केला. पण तो करताना रश्मी शुक्लांनी अधिकारांचा कसा कसा वापर केला हे सांगितले. फक्त फोन टॅपिंगचे कॉल रेकॉर्ड्स आणि त्याची माहिती कुठेही लिक केलेली नाही, त्यामुळे तपास करण्याची गरज नाही असं कारण देत क्लोजर रिपोर्ट सादर केला होता. अर्थात न्यायालयाने तो अमान्य केला. रश्मी शुक्लांनी फोन टॅपिंग करण्यासाठी आपल्यावर दबाव टाकला असं जाबाब तत्कालीन पोलीस उपायुक्त पंकज डहाणे यांनी या प्रकरणाची चौकशी करणाऱ्या समितीसमोर दिलाय. हा जाबाब क्लोजर रिपोर्ट नाकारण्यास महत्वाचे कारण ठरलाय.

व्हाट्सप्प आइकान को दबा कर इस खबर को शेयर जरूर करें |