Cake Cutting With Sword : तलवार, कोयत्याने केक कापणं महागात; पुण्यात एकाला बेड्या तर मुंबईतील तरुणाचा शोध सुरु
😊 Please Share This News 😊
|
Cake Cutting With Sword : वाढदिवसाला तलवार (Sword) तसंच इतर धारदार शस्त्राने केक (Cake) कापण्याच्या घटनांमध्ये दिवसेंदिवस वाढ होताना दिसत आहे. मुंबई (Mumbai) आणि पुणे (Pune) या मोठ्या शहरामध्ये असाचा प्रकार समोर आला आहे. कोयता आणि तलवारीने केक कापणं दोन तरुणांच्या अंगलट आलं आहे. पुण्यात कोयत्याने केक कापून व्हिडीओ व्हायरल करणाऱ्याला बेड्या ठोकण्यात आल्या आहेत. तर मुंबई तलवारीने 21 केक कापणाऱ्या एका 17 वर्षीय मुलाविरोधात आर्म्स अॅक्टविरोधात गुन्हा नोंदवण्यात आला असून पोलीस त्याचा शोध घेत आहेत.
कोयत्याने केक कापून दहशत निर्माण करण्याचा प्रयत्न
पुण्यात दहशत निर्माण करण्यासाठी वाढदिवसाला धारदार कोयत्याने केक कापणारा आणि त्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल करणारा आरोपी हा पुणे पोलिसांच्या गुन्हे शाखा युनिट 1 च्या ताब्यात सापडला आहे. अतिष लांडगे असं ताब्यात घेतलेल्या आरोपीचं नाव असून त्याच्याकडून एक कोयता आणि 500 रुपये असा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला. पुणे शहरात गेले अनेक दिवसांपासून असे केक कापून व्हिडीओ व्हायरल करण्याच्या घटनेत वाढ झाली आहे. त्यावर आळा घालण्यासाठी पोलिसांनी ही कारवाई केली. या प्रकरणी खडक पोलिसांत गुन्हा दाखल झाला होता. त्यानंतर गुन्हे शाखेने ही कारवाई केली.
तलवारीने 21 केक कापले, 17 वर्षीय मुलावर आर्म्स अॅक्टअंतर्गत गुन्हा
मुंबईत वाढदिवसाच्या निमित्ताने तलवारीने केक कापणं एका मुलाला महागात पडलं आहे. मुंबई पश्चिम उपनगरातील बोरिवली परिसरातील एमएचबी पोलिसांनी 17 वर्षीय मुलाविरोधात आर्म्स अॅक्ट अंतर्गत गुन्हा नोंदवला आहे. शुक्रवारी (16 एप्रिल) रात्री हा मुलगा आपल्या मित्रांसह वाढदिवस साजरा करत होते. यावेळी या मुलाने तलवारीने तब्बल 21 केक कापले. या केक कटिंगचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर याची माहिती पोलिसांनाही मिळाली. अशाप्रकारणे तलवारीचा वापर करणे हे कायद्याचं उल्लंघन आहे. त्यामुळे पोलिसांनी दुसऱ्याच दिवशी म्हणजच 17 सप्टेंबरला आर्म्स अॅक्ट अंतर्गत गुन्हा दाखल केला. पोलीस आता या मुलाचा शोध घेत आहेत.
याआधी तलवारी केक कापण्याच्या अनेक घटना
आपला वाढदिवस संस्मरणीय ठरावा अशी अनेकांची इच्छा असते. त्यासाठी वेगवेगळ्यो गोष्टींचं प्लॅनिंग केलं जातं. काही जण हॉटेल, पबमध्ये किंवा घरीच मोठ्या दणक्यात वाढदिवस साजरा करतात. तर काही जण काहीतरी हटके करण्यासाठी शस्त्राने केक कापतात. परंतु तलवारीने केक कापणं हा कायद्याने गुन्हा आहे. तलवारीने केक कापून वाढदिवस साजरा करुन दहशत निर्माण करण्याचा काहींचा प्रयत्न असतो. याआधी वाढदिवसाला तलवारीने केक कापल्याच्या काही घटना समोर आल्या आहेत. मात्र हीच बाब त्यांना महागात पडते.
व्हाट्सप्प आइकान को दबा कर इस खबर को शेयर जरूर करें |